शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सात हजार रुग्णांना घरातच ‘उपचाराचा डाेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:17 IST

जिल्ह्यात बेड मिळत नसल्याने रुग्णांसह नातेवाइकांची ससेहाेलपट : अपयश लपविल्याचा प्रशासनावर आरोप 

लाेकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्यात काेराेना रुग्णांचा आलेख झपाट्याने उसळी घेत आहे. बहुतांश सरकारी आणि खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. बेड मिळत नसल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांचे चांगलेच हाल हाेत आहेत. सद्य:स्थितीत सुमारे सात हजार काेराेना रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. प्रशासन आपले अपयश लपविण्यासाठीच रुग्णांवर घरी उपचार करत आहे, असा सर्रास आराेप केला जात आहे.काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने सर्वांचीच झाेप उडाली आहे. जिल्ह्यात दिवसाला किमान बाराशे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील चार लाख ७५ हजार ४६७ नागरिकांचे स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे. पैकी तीन लाख ९४ हजार ४६५ जणांचे रिपाेर्ट निगेटिव्ह आले आहेत, तर ८७ हजार ६८४ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. ३२७ नागरिकांचे रिपाेर्ट अद्यापही प्रलंबित आहेत. सध्या सुमारे साडेनऊ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सातत्याने वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येपुढे आराेग्य व्यवस्थेचे हात ताेकडे पडत आहेत. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड हाऊसफुल्ल झाले आहेत. बेड मिळविण्यासाठी रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची ससेहाेलपट हाेत आहे. रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक नसल्याने आता काय करायचे, असा सवाल रुग्णांसह त्याच्या नातेवाइकांना पडला आहे. उपचार मिळावेत यासाठी सरकार आणि प्रशासन काेणते प्रयत्न करत आहेत, असा संतप्त सवालही त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. रुग्णालयांमध्ये बेडच शिल्लक नसल्याने घरीच उपचार घेण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील तब्बल सात हजार रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. आराेग्य यंत्रणा आपले अपयश लपविण्यासाठी रुग्णच घरी उपचाराला पसंती देत असल्याचे सांगत असावेत, असे आसूडही रुग्णांचे नातेवाईक ओढत आहेत.जिल्हा सरकारी रुग्णालयातील आयसीयू सुद्ध फुल्ल झाले आहे. जिजामाता येथील बेडसाठी मारामारी हाेत आहे. सरकार आणि प्रशासन आराेग्य यंत्रणा सुधारण्यासाठी काेणते प्रयत्न करत आहे याबाबत सर्वच आलबेल असल्याचे दिसून येते. पनवेल तालुक्यातील आठ, कर्जत आणि खालापूर येथील प्रत्येकी दाेन, अलिबाग, पेण, माणगाव, महाड येथील प्रत्येकी एक अशी एकूण १६ खासगी रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत. घरी उपचार घेणाऱ्यांना डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे दिली जात आहेत. त्यांना अधिक त्रास जाणवल्यास संबंधित डाॅक्टरांना ते फाेनल्रूरुन सल्ला घेत आहेत. तब्बल ८५ टक्के लक्षण नसलेले आणि साेम्य लक्षणे असलेले रुग्ण सात ते आठ दिवसांमध्ये बरे हाेत असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. आम्ही त्यांना सल्ला देताे; मात्र ते घरीच विलगीकरणात राहण्याला पसंती देतात.यंत्रणेची दमछाकरुग्णसंख्या वाढत असल्याने बेडची कमतरता भासत आहे. उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना तातडीने सुट्टी देऊन रिकामा झालेला बेड नवीन भरती हाेणाऱ्या रुग्णांना दिला जात आहे. मात्र, बेड देताना आराेग्य यंत्रणेची चांगलीच दमछाक हाेत आहे.

प्रशासन त्यांच्यावर काेणताही दबाव टाकत नाही. रुग्णांवर देखरेख ठेवण्यात येते तसेच अधिक त्रास झाल्यास त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांचे फाेन नंबर त्यांना दिलेले असतात.- डाॅ. सुधाकर माेरे, जिल्हा आराेग्य अधिकारी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस