५१ दाखल्यांवर होणार डिजिटल स्वाक्षरी
By Admin | Updated: April 27, 2017 00:01 IST2017-04-27T00:01:20+5:302017-04-27T00:01:20+5:30
सरकारी तसेच शैक्षणिक कामांसाठी लागणारे अधिवास, उत्पन्नाच्या दाखल्यांवर प्रशासकीय अधिकारी आता डिजिटल स्वाक्षरी करणार आहेत.

५१ दाखल्यांवर होणार डिजिटल स्वाक्षरी
अलिबाग : सरकारी तसेच शैक्षणिक कामांसाठी लागणारे अधिवास, उत्पन्नाच्या दाखल्यांवर प्रशासकीय अधिकारी आता डिजिटल स्वाक्षरी करणार आहेत. त्यामुळे सर्व दाखले ई-डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून अथवा आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना हे दाखले घरच्याघरी प्राप्त होणार आहेत.
नागरिकांना घरबसल्या ई-पद्धतीने विविध प्रकारचे दाखले मिळावे तसेच दाखले वाटपातील वेळ कमी होऊन त्यात पारदर्शकता यावी शिवाय गैरप्रकाराला आळा घालता येणार आहे. शालान्त परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जातीचा दाखला, उत्पन्न, क्रि मिलेअर आणि अधिवास दाखला असे विविध दाखले घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात विद्यार्थी, पालकांची झुंबड उडते. थोड्या काळात हजारो अर्ज आल्याने जिल्हा प्रशासनाचीही दाखले देताना दमछाक होते. स्वाक्षरीसाठी अधिकारी उपलब्ध नसणे, अधिकाऱ्यांकडे अर्ज प्रलंबित राहणे अशा प्रकारच्या तक्र ारी प्राप्त होतात. आता नागरिकांना विनातक्र ार घरबसल्या अर्ज मिळावे यासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वसामान्य नागरिकांना वारंवार लागणारे आणि महत्त्वाचे दाखले तातडीने देता यावेत म्हणून सरकारने डिजिटल पद्धत अस्तित्वात आणली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या पद्धतीचा अवलंब करण्यास सुरु वात करण्यात आली आहे. यात सेवा हमी कायद्यांतर्गत विविध प्रकारच्या सेवा आॅनलाइन उपलब्ध करून देणे, सात बारा संगणकीकरण यासारख्या सेवा डिजिटल केल्या जात असतानाच आता डिजिटल स्वाक्षरीनिशी दाखले देण्यास प्रशासन सुरुवात करणार आहे.