नागोठणेत ५० तासांनी सोहळ्याची सांगता

By Admin | Updated: April 16, 2017 04:33 IST2017-04-16T04:33:00+5:302017-04-16T04:33:00+5:30

शहरातील ग्रामदैवतांचा पालखी सोहळा ५० तासांनी पूर्ण झाला. पालखी शुक्रवारी दुपारी १२ वाजता मंदिरात आल्यानंतर आरती, तसेच मानाच्या नारळांचे वाटप

50 hours after the stalemate | नागोठणेत ५० तासांनी सोहळ्याची सांगता

नागोठणेत ५० तासांनी सोहळ्याची सांगता

नागोठणे : शहरातील ग्रामदैवतांचा पालखी सोहळा ५० तासांनी पूर्ण झाला. पालखी शुक्रवारी दुपारी १२ वाजता मंदिरात आल्यानंतर आरती, तसेच मानाच्या नारळांचे वाटप करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.
ग्रामदैवत श्री जोगेश्वरीमाता - भैरवनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यास बुधवारी १२ एप्रिलला सकाळी १० वाजता देवीचे भक्त मधुकर पोवळे यांच्या हस्ते पूजा-अर्चा करून प्रारंभ करण्यात आला होता. या वेळी विश्वस्त मंडळाचे नरेंद्र जैन, दिलीप टके, जयराम पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब टके, सुधाकर चितळे, अनिल नागोठणेकर, बबन मोरवणकर आदी पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
जोगेश्वरी मंदिरापासून ग्रामपंचायत कार्यालयामार्गे बंगलेआळी, कासारआळी, शिवाजी चौक, कोळीवाडा, बाजारपेठ, गुरवआळी, गांधी चौक, प्रभूआळी, गवळआळी, मराठआळी, कुंभारआळी, प्रभूआळी, ब्राह्मणआळी, आंगरआळी, जोगेश्वरीनगर, रामनगर, शांतिनगर, सूर्यदर्शन कॉलनी, खडकआळी आदी भागांत पालखी फिरवण्यात आल्यानंतर शुक्र वारी दुपारी १२ वाजता पालखीचे मंदिरात आगमन झाले. देवतांचे मुखवटे मंदिरात नेल्यानंतर आरती करण्यात आली.
सोहळ्यादरम्यान उल्लेखनीय कार्य केलेल्या मंडळींना मानाच्या श्रीफळाचे मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात येऊन अतिभव्य अशा या पालखी सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब टके यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, तसेच सदस्य, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: 50 hours after the stalemate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.