शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

कामगार कल्याणासाठी ५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 3:05 AM

इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ : आतापर्यंत ५ हजार २७१ वास्तुनिर्मितीकार लाभार्थ्यांना २ कोटी ६३ लाखांचे वितरण

जयंत धुळप 

अलिबाग : आपल्या श्रमांनी वास्तुनिर्मिती करून निवारा उभारून देणाऱ्या कसबी कामगारांना आयुष्यात उत्तम आरोग्य, त्यांच्या पुढच्या पिढीला शिक्षण आदी सुविधा व सुरक्षितता देण्यासाठी शासनाने इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची निर्मिती केली आहे. रायगड जिल्ह्यात या मंडळाच्या योजना कामगार उप आयुक्त कार्यालय, रायगडमार्फत राबविण्यात येतात. जिल्ह्यातील वास्तू निर्मितीकारांच्या कल्याणासाठी जिल्ह्याला ५ कोटी २४ लाख ८४ हजार रु पये निधी प्राप्त झाला असून आतापर्यंत ५ हजार २७१ पात्र कामगारांना २ कोटी ६३ लाख ३६ हजार ४०० रु पये निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याचे कामगार उपायुक्त भगवान आंधळे यांनी दिली आहे. या निधीतून कामगारांचे शिक्षण, आरोग्य यासारख्या सुविधांची पूर्तता करण्यात येत आहे.

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन आणि सेवाशर्ती) अधिनियम १९९६ अंतर्गत नोव्हेंबर २०१८ अखेरीस ४५५ आस्थापना नोंदीत करण्यात आल्या आहेत. तसेच इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळामध्ये नोव्हेंबर २०१८ अखेरीस २१ हजार ६६३ कामगारांची लाभार्थी कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे. नोव्हेंबर २०१८ अखेर मंडळाने घोषित केल्याप्रमाणे १८२ नोंदीत लाभार्थी कामगारांना प्रति लाभार्थी तीन हजार रु पयांप्रमाणे ५ लाख ४६ हजार रु पये अर्थसाहाय्य वाटप करण्यात आले असून, ५०२० लाभार्थी कामगारांना प्रत्येकी पाच हजार रु पयांप्रमाणे २ कोटी ५१ लाख रुपये अवजारे खरेदी करण्याकरिता अर्थसाहाय्य वाटप करण्यात आले आहे. ६७ लाभार्थी कामगारांना शैक्षणिक लाभ ६ लाख ६० हजार ४०० रु पये तर दोघा लाभार्थी कामगारास ३० हजार रु पये प्रसूती लाभाची रक्कम वाटप करण्यात आली आहे. जिल्ह्यात कामगारांच्या कल्याणासाठी एकूण ५ कोटी २४ लाख ८० हजार रु पये निधी प्राप्त झाला असून आतापर्यंत एकूण २ कोटी ६३ लाख ३६ हजार ४०० रु पये इतक्या रकमेचे वाटप ५२७१ लाभार्थी कामगारांना करण्यात आले आहे.बांधकाम कामगार नोंदणी जबाबदारी कंत्राटदाराचीच्बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याची जबाबदारी ही त्या त्या बांधकाम मालकाची म्हणजेच कंत्राटदाराची असते.च्तसेच जे कामगार दररोज वेगळ्या वेगळ्या ठिकाणी रोजंदारी स्वरूपात कामावर जातात (मजूर अड्ड्यावरील कामगार) अशा कामगारांची नोंदणी जिल्ह्यातील कार्यरत गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे होते.च्त्याबाबत त्यांना नोंदणी झाल्याचा दाखलाही दिला जातो. तसेच जिथे जिथे बांधकाम नाके असतात, अशा ठिकाणीही एकत्रित नोंदणी होऊ शकते.च्जिल्ह्यातील जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी नोंदणी करावी व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार उपायुक्त आंधळे यांनी केले आहे.2018नोव्हेंबर455आस्थापना नोंदीतइमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळामध्ये21, 663कामगारांची लाभार्थी कामगार म्हणून नोंदणीनोंदणी कशी कराल?च्विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित कामगारांनी ९० दिवस काम केल्याचे मालकांचे प्रमाणपत्र, आपले बँक खात्याचे विवरण व आधारक्र मांक नोंदवायचा असतो. त्यानंतर कामगाराची नोंदणी होते. ही नोंदणी दोन वर्षांसाठी असते. त्याचे नूतनीकरण करता येते त्यासाठी २५ रु पये शुल्क आकारले जाते. शिवाय दरमहा १ रु पया अंशदान घेतले जाते. सध्या रायगड जिल्ह्यात नोव्हेंबर २०१८ अखेर २१ हजार ६६३ कामगारांची लाभार्थी नोंदणी झाली आहे. 

टॅग्स :Raigadरायगड