जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ४४ केंद्रे; प्रशासन झाले सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 04:27 IST2019-02-21T04:26:37+5:302019-02-21T04:27:17+5:30
विज्ञान शाखेतून दहा हजार ४९२, कला शाखेतून आठ हजार ८९४ , वाणिज्य शाखेतून १२ हजार २९० तसेच किमान कौशल्य म्हणजेच एमसीव्हीसी शाखेतील ७८३ असे एकूण ३२ हजार ४५९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ४४ केंद्रे; प्रशासन झाले सज्ज
अलिबाग : गुरुवार, २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या (एचएससी) परीक्षा सुरू होत आहेत. विज्ञान, कला, वाणिज्य आणि किमान कौशल्य या शाखेतील एकूण ३२ हजार ४५९ विद्यार्थी ४४ केंद्रामध्ये परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
विज्ञान शाखेतून दहा हजार ४९२, कला शाखेतून आठ हजार ८९४ , वाणिज्य शाखेतून १२ हजार २९० तसेच किमान कौशल्य म्हणजेच एमसीव्हीसी शाखेतील ७८३ असे एकूण ३२ हजार ४५९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अलिबागसह ४४ केंद्रामध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेच्या कालावधीत ४४ केंद्र संचालक, १५ परिरक्षक नेमण्यात आले आहेत. परीक्षेच्या कालावधीत गैरप्रकार घडू नये. कॉपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण सहा भरारी पथक व एक विशेष पथक असे एकूण सात पथक तयार करण्यात आले आहेत.
मुरुडमधील ६५४ विद्यार्थी बसणार परीक्षेला
च्आगरदांडा : बारावीच्या परीक्षेला तालुक्यातील ६५४ विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा २० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. नऊ भाषा विषयांसाठी कृती पत्रिका तर, विज्ञान आणि गणित विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. तालुक्यातील मुरुड सर एस.ए. हायस्कूल परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये याकरिता केंद्रातर्फे काळजी घेण्यात आली असून चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. विद्यार्थ्यांनी मोबाइल आणू नये, असे आवाहन केंद्र प्रमुख आर. एन. मोरे, उपकेंद्र प्रमुख बी. एस. मोरे यांनी के ले आहे. विशेष पथकात अण्णा वाडकर, उल्हास गुंजाळ, राहुल वर्तक, विजय कदम हे आहेत.
विज्ञान, कला, वाणिज्य आणि किमान कौशल्य
32,459
44
एकूण परीक्षा केंद्र
जिल्हा प्रशासन सज्ज