शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सुनील तटकरेंची संपत्ती ५ वर्षांत किती वाढली? जंगम, स्थावर मालमत्ता ८,६२,९३,८६६ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 08:19 IST

सुनील तटकरेंची संपत्तीत ५ वर्षांत ४१ लाखांची वाढ; जंगम, स्थावर मालमत्ता ८,६२,९३,८६६ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी गुरुवारी स्वत:चे चार उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्याकडे दाखल केले. ते दाखल करताना त्यांनी शपथपत्रात जंगम आणि स्थावर मालमत्ता ८ कोटी ६२ लाख ९३ हजार ८६६ रुपये असल्याचे जाहीर केले आहे. तर, पत्नी वरदा तटकरे यांच्या नावे ५ कोटी ९४ लाख ७४ हजार ९०७ एवढी जाहीर केली आहे. पाच वर्षांत सुनील तटकरे यांच्या संपत्तीत ४१ लाख ६२ हजार ३६३ रुपयांची वाढ झाली.

तटकरे यांच्या पत्नीच्या संपत्तीत १ कोटी ४१ लाख १९ हजार १३३ रुपयांनी वाढ झाली आहे. तटकरे यांच्या नावावर १ लाख १४ हजार ५२० रुपये कर्ज असून, एकही गुन्हा, खटला नसल्याचे प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे. तटकरे यांनी  उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

२०१९च्या निवडणुकीतयाआधीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम आणि स्थावर मालमत्ता ८ कोटी २१ लाख ३१ हजार ५०३ रुपयांची असल्याचे जाहीर केले होते. तर, पत्नी वरदा तटकरे यांची ४ कोटी ५३ लाख ५५ हजार ७७४ एवढी जाहीर केली होती. 

सद्य:स्थितीत  - तटकरे यांच्याकडे २ लाख ७१ हजार ५४५ रोख रक्कम आहे. पत्नी वरदा तटकरे यांच्या नावावर १ कोटी २२ लाख ५७ हजार ५१० जंगम तर ४ कोटी ७२ लाख १७ हजार ३९७ रुपये स्थावर मालमत्ता अशी ५ कोटी ९४ लाख ७४ हजार ९०७ रुपये मालमत्ता प्रतिज्ञापत्रात दाखवली आहे. - वरदा तटकरे यांच्या हातात ४ लाख ५८ हजार २८१ रुपये रोख रक्कम आहे. तटकरे यांच्या नावावर एक इनोव्हा क्रेटा हे वाहन आहे. १ लाख १४ हजार ५२० रुपये कर्ज आहे.

टॅग्स :alibaugअलिबागsunil tatkareसुनील तटकरे