शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यासाठी मिळाल्या ३४ हजार ४० प्रतिबंधक लसी , ३३ हजार ५०० कोव्हिशिल्ड तर ५४० कोव्हॅक्सिन लसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 09:25 IST

सर्व कोव्हॅक्सिन लसी या दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. तर २१ हजार ९०० कोव्हिशिल्ड लसींमधील ७० टक्के लसी दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक ३४ हजार ४० लस प्राप्त झाल्या आहेत. यामधील ३३ हजार ५०० कोव्हिशिल्ड लस असून, ५४० कोव्हॅक्सिन लसी आहेत. या सर्व लसींचे लसीकरण केंद्रांत वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली. रायगड जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय पेण, जुने पनवेल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक १, नवीन पनवेल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ३, नवीन पनवेल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ५, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, उपजिल्हा रुग्णालय माणगाव, उपजिल्हा रुग्णालय रोहा, ग्रामीण रुग्णालय महाड, ग्रामीण रुग्णालय उरण येथे लसीकरण करण्यात येत आहे. तर ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये यासह जिल्हा परिषदेची ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या अखत्यारित असलेल्या निवडक उपकेंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.सोमवारी जिल्ह्यासाठी ३४ हजार ४० लस प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये १८ ते ४४ या वयोगटातील लाभार्थ्यांसाठी ११ हजार ६०० कोव्हिशिल्ड लसींचा समावेश आहे. तर ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी २१ हजार ९०० कोव्हिशिल्ड लसी असून, ५४० कोव्हॅक्सिन लसींचा समावेश आहे. सर्व कोव्हॅक्सिन लसी या दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. तर २१ हजार ९०० कोव्हिशिल्ड लसींमधील ७० टक्के लसी दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहेत.

सर्व कोव्हॅक्सिन लसी या दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. तर २१ हजार ९०० कोव्हिशिल्ड लसींमधील ७० टक्के लसी दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस