३१ शिक्षकांचा अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे, ४१ शिक्षकांचे समायोजन आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:33 AM2017-11-24T02:33:37+5:302017-11-24T02:33:47+5:30

रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या ७३ जागा रिक्त होत्या. त्या जागांसाठी १२१पैकी ४१ शिक्षकांचे समायोजन नुकतेच आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले.

31 teachers report to Education Deputy Directors, 41 teachers adjustment online | ३१ शिक्षकांचा अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे, ४१ शिक्षकांचे समायोजन आॅनलाइन

३१ शिक्षकांचा अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे, ४१ शिक्षकांचे समायोजन आॅनलाइन

Next

आविष्कार देसाई 
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या ७३ जागा रिक्त होत्या. त्या जागांसाठी १२१पैकी ४१ शिक्षकांचे समायोजन नुकतेच आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले. त्यामध्ये ४० मराठी आणि एका उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा समावेश आहे. उर्वरित ३१ अतिरिक्त ठरलेले शिक्षक हे निकषामध्ये बसत नसल्याने त्यांच्या समायोजनाबाबतचा अहवाल शिक्षण उपसंचालक यांना पाठवण्यात आला आहे. त्यामुळे ३१ शिक्षकांना राज्यातील कोणत्याही शाळेत आता नोकरीसाठी जावे लागणार आहे.
शिक्षकांचे समायोजन करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची ओरड आपल्याला नेहमीच ऐकायला मिळत होती. त्यामुळे वशिला असणाºया शिक्षकांना पाहिजे तेथे नोकरीसाठी जाता येत होते. त्याचप्रमाणे अतिरिक्त ठरणारे शिक्षक हे काही सरकारी अधिकाºयांना मलिदा देऊन समायोजन करीत होते. त्यामुळे ज्येष्ठता आणि गुणवत्ता यांना तीलांजली दिली जात होती. कालांतराने अशी प्रकरणे बाहेर येऊ लागल्याने सरकारची बदनामी होत होती. यावर उपाययोजना म्हणून सरकारने आॅनलाइन पद्धतीने समायोजन करण्याचा आमूलाग्र बदल अमलात आणला. त्यामुळे सरळ होणाºया भ्रष्टाचाराला काही अंशी लगाम बसण्यास मदत झाल्याचा दावा सरकारी अधिकाºयांनीच केला.
रायगड जिल्ह्यामध्ये माध्यमिकच्या ३०२ शाळा आहेत. सुमारे एक लाख पाच हजार विद्यार्थी संख्या आहे. साडेतीन हजारांच्या आसपास शिक्षक आहेत. २०१६मध्ये समायोजन करण्यात आले होत. त्या वेळी १७५ शिक्षक हे अतिरिक्त ठरले होते. २०१७ मध्ये झालेल्या समायोजनात ३१ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या ७३ जागा रिक्त होत्या. मराठी माध्यमाच्या ११८ शिक्षकांपैकी ४० शिक्षकांचे समायोजन आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले, तर तीन उर्दू माध्यमाच्या शिक्षकांपैकी एकाच शिक्षकाचे समायोजन आॅनलाइन पद्धतीने झाले. अशा एकूण ४१ शिक्षकांचा त्यामध्ये समावेश होता. म्हणजेच रिक्त असणाºया ७३ जागांपैकी ४१ शिक्षकांचे समायोजन झाल्याने अद्यापही ३१ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.
कॅटॅगरी, विषय शिक्षक यासह अन्य निकषामध्ये हे ३१ शिक्षक बसत नसल्याने त्यांचे समायोजन होऊ शकले नाही. त्यांच्या समायोजनाचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने सांगितले.
>आहे त्या शाळेतच काम करता येण्याची शक्यता
गेल्या वर्षी १७५ पैकी ५२ शिक्षकांच्या समायोजनाचा प्रस्ताव माध्यमिक विभागाने शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठविला होता.
मात्र, त्यांच्याकडून समायोजनाची प्रक्रिया न झाल्याने अतिरिक्त ठरलेल्या ५२ शिक्षकांना आहे त्याच शाळेमध्ये समाविष्ट केले होते.
त्यामुळे या वर्षी ३१ अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या बाबतीत तसे झाले, तर आहे त्याच शाळेत काम करता येण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोलले जाते.
>३१ अतिरिक्त ठरणाºया शिक्षकांचे समायोजन आता शिक्षण उपसंचालक करणार आहेत. त्यामुळे ३१ अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना निकष न डावलता राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शाळेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना राज्यातील कोणत्याही शाळेत जाण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचे बोलले जाते.
>२०१६मध्ये समायोजन करण्यात आले होते. त्या वेळी १७५ शिक्षक हे अतिरिक्त ठरले होते. २०१७ मध्ये झालेल्या समायोजनात ३१ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.

Web Title: 31 teachers report to Education Deputy Directors, 41 teachers adjustment online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.