कडसुरे ग्रामपंचायतीमध्ये २८ लाखांचा अपहार
By Admin | Updated: October 28, 2016 03:49 IST2016-10-28T03:49:17+5:302016-10-28T03:49:17+5:30
ग्रामपंचायतीचे कामकाज पाहात असताना ग्रामपंचायतीच्या शासकीय रकमेचा तपशील न ठेवता खोटे हिशेब तयार करून अपहार केल्याप्रकरणी कडसुरे ग्रामपंचायतीचे तत्कालीन

कडसुरे ग्रामपंचायतीमध्ये २८ लाखांचा अपहार
नागोठणे : ग्रामपंचायतीचे कामकाज पाहात असताना ग्रामपंचायतीच्या शासकीय रकमेचा तपशील न ठेवता खोटे हिशेब तयार करून अपहार केल्याप्रकरणी कडसुरे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक प्रमोद तरे आणि माजी सरपंच बाळा पिंगळा या दोघांच्या विरोधात रोहे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गोरखनाथ
वायल यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सन २०१३ ते २०१५ या कालावधीत तत्कालीन ग्रामसेवक प्रमोद तरे (रा. झोतीरपाडा) आणि सरपंच बाळा पिंगळा (रा. कागदावाडी) यांनी कडसुरे ग्रामपंचायतीचा ग्राम निधी, १३ वा वित्त आयोग निधी, पाणीपुरवठा आदी खात्यातील शासकीय रकमेचा अपहार केला असल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपहाराची रक्कम २८ लाख २५ हजार २७९ रु पये इतकी आहे. शासकीय रकमेचा तपशील न ठेवता त्यांनी खोटे हिशेब तयार केल्याचे स्पष्ट झाल्याने या दोघांच्या विरोधात रोहे पंचायत समितीचे वायल यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप पालवणकर पुढील तपास करीत आहे. तरे आणि पिंगळा यांना अद्याप ताब्यात घेतले नसले तरी त्यांना लवकरच अटक केली जाईल असे संकेत मिळत आहेत. (वार्ताहर)