शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

जिल्ह्यात यंदा २६८ सार्वजनिक गणेशोत्सव; महामार्गावर २४ सीसीटीव्हीची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:50 IST

येत्या १३ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात २६८ सार्वजनिक तर ९९ हजार ९२ घरगुती गणपतींचे आगमन आहे तर १५ हजार ६६७ गौरींचे आगमन शनिवार, १५ सप्टेंबर रोजी होणार आहे.

- जयंत धुळपअलिबाग : येत्या १३ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात २६८ सार्वजनिक तर ९९ हजार ९२ घरगुती गणपतींचे आगमन आहे तर १५ हजार ६६७ गौरींचे आगमन शनिवार, १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. सर्वाधिक ३८ सार्वजनिक गणपती खोपोलीमध्ये तर सर्वाधिक ८ हजार ६९९ घरगुती गणपती माणगावमध्ये आहेत. मुरुड आणि म्हसळा येथे एकही सार्वजनिक गणपती नाही.१३ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरु होत असून त्याकरिता गोवा महामार्गावरुन जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांच्या सुरक्षित प्रवासासाठी रायगड वाहतूक पोलीस विभागाने महामार्गाच्या खारपाडा ते कशेडी या टप्प्यात पोलीस बंदोबस्तासह अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त वाहतूक नियंत्रण व्यवस्था तैनात केली आहे. सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, १६ पोलीस निरीक्षक, २४ सह. पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, २९७ पोलीस कर्मचारी तसेच पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक स्तरावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.गोवा राष्ट्रीय महामार्गावर२४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेगणेशोत्सव बंदोबस्तांतर्गत गोवा राष्ट्रीय महामार्गावर एकूण २४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत, त्यायोगे वाहतूककोंडी टाळून वाहतूक सुरळीत सुरु ठेवणे सुकर होणार आहे. गोवा राष्ट्रीय महामार्गावर जिते, हमरापूर येथे प्रत्येकी दोन, पेण-खोपोली बायपास येथे तीन, रामवाडी चौकी व कांदळेपाडा येथे प्रत्येकी दोन, इंदापूर बस स्टॅन्ड येथे तीन, लोणेरेफाटा येथे दोन, नातेखिंड येथे तीन, विसावा हॉटेल येथे दोन आणि पाली शहरात तीन असे एकूण २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.१२ ठिकाणी रुग्णवाहिका तर ११ ठिकाणी क्रे न व टोइंगगोवा राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्यावर तत्काळ उपाययोजनेकरिता १२ ठिकाणी रु ग्णवाहिका तर ११ ठिकाणी क्रे न व टोइंग कारची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, गणेशोत्सव कालावधीत मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदीबाबत गृहमंत्रालयाकडून आदेश लागू करण्यात आला आहे.जिल्ह्यात ७०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईहिंदू बांधवांचा गणेशोत्सव सण तर मुस्लीम बांधवांचा मोहरमचा सण शांततेत पार पाडण्यासाठी रायगड जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकारी यांनी १ हजार ५३ गाव भेट घेतल्या असून गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता व मोहल्ला समित्यांच्या २७६ बैठका घेतल्या आहेत. रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता शुक्रवारपर्यंत ७०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवRaigadरायगड