शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नऊ महिन्यांत ऑनलाइन फसवणुकीच्या 26 तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 01:01 IST

बनावट फोन कॉल करून घातला जातो गंडा; एका तक्रारीचा तपास पूर्ण

निखिल म्हात्रेअलिबाग : बनावट फोन कॉल करून एटीएम व बँक खात्याची माहिती विचारून खात्यातून ऑनलाइन रक्कम परस्पर लांबवण्यासह मागील नऊ महिन्यांत ऑनलाइन फसवणुकीच्या २६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील एका तक्रारीचा तपास पूर्ण झाला आहे तर उर्वरित २५ तक्रारींचा तपास सुरू आहे. 

लॉटरी लागल्याचा अचानक येणारा ई-मेल, विम्याची रक्कम, नोकरीची संधी, दामदुप्पट रक्कम, विविध फ्राॅड कंपन्यांचे येणारे मेसेज आदी मोहाच्या सापळ्यात शेकडो जण अडकतात. अशी रक्कम आपल्याला का आणि कोण देणार, याचा विचार केला जात नाही. त्यासाठी ओटीपीपासूनची माहिती लगेचच पुरविली जाते. नंतर मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे नागरिकांनी फेक काॅल्सला बळी पडू नये. तसेच ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे अवाहनही रायगड पोलीस दलाकडून करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोबाइलवरून ई-व्यवहार करताना खाचाखोचा ठाऊक नसतात. भामटे फायदा उठवितात. 

ऑनलाइन गंडाऑनलाइन गंडा घालणे सायबर गुन्हेगाराला एका हाताने टाळी वाजविण्याइतके सोपे झाले आहे. इंटरनेटवर शेकडो ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट आहेत आणि ऑनलाइन शॉपिंग करण्याचे लोकांना जणू व्यसन लागले आहे.  ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून एखादी वस्तू खरेदी करण्यात येते. खरेदी केल्यावर कार्डद्वारे, नेटबँकिंगच्या माध्यमातून पैसेदेखील देतात; मात्र  अशा फसवणूक प्रकारात शॉपिंग केलेली वस्तू न येता दुसरीच वस्तू  येते. 

ज्येष्ठ नागरिक ई-व्यवहारात फसविले जातातअनेकदा ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी बँकेत जाणे अडचणीचे होते. बऱ्याचदा एकटेदुकटे ज्येष्ठ नागरिक ई-व्यवहारात फसविले जातात. ई-साक्षरतेचा अभाव घातक ठरू शकतो. त्या अज्ञानामुळे हे भामटे तुमची आयुष्यभराची पुंजी पळवू शकतात. जर कार्डद्वारे बिल अदा केले तर आपल्या बँक खात्यामधील पैसे काही सेकंदांत काढले? जातात, मी कार्ड वापरले नाही, तर माझ्या खात्यामधून पैसे कुणी काढले? गुन्हेगार पैसे काढत असतो आणि एसएमएस आपल्याला येतात. 

डायल करा १००फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला १०० नंबरवर कॉल करुन माहिती द्यावी.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड