शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीत शिक्षा होऊनही 23 जण अद्याप सरकारी सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 06:31 IST

गुन्हा सिध्द झालेल्या २३ आरोपींना संबंधित जिल्हा व सत्र न्यायालयाने गुन्ह्याबाबत किमान ६ महिने  ते तीन वर्षांपूर्वी  शिक्षा सुनावलेली आहे

जमीर काझी अलिबाग : लाचखोरीचा गुन्हा  न्यायालयात सिद्ध होऊनही २३ जण अद्याप सरकारी सेवेत कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून त्यांच्या बडतर्फीचे आदेश काढण्यात आलेले नाहीत. संबंधित विभागाकडे याबाबतच्या प्रस्तावाच्या फायली रेंगाळत पडल्या आहेत. त्याबाबत  अनेक वेळा स्मरणपत्रे पाठवूनही कारवाईस दिरंगाई केली जात आहे. 

गुन्हा सिध्द झालेल्या २३ आरोपींना संबंधित जिल्हा व सत्र न्यायालयाने गुन्ह्याबाबत किमान ६ महिने  ते तीन वर्षांपूर्वी  शिक्षा सुनावलेली आहे. ड्युटीवर कार्यरत असताना    गरजू नागरिकांची आवश्यक कामाची पूर्तता करून देण्यासाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली होती. त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल केले होते.

लाचखोरीप्रकरणी शिक्षा होऊनही बडतर्फीची कारवाई न झालेले एकूण २३ जण आहेत. त्यामध्ये शिक्षण विभागातील परभणीतील एका विद्यालयातील मुख्याध्यापकाला १९ ऑक्टोबर २०१६ रोजी चार वर्षांची सक्तमजुरीची व तीन हजार रुपयांचा दंड झाला होता. त्याने अपील दाखल केले.

त्याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केल्याने ते प्रकरण अद्याप प्रलंबित असून, दरम्यानच्या काळात ३१ ऑक्टोबर २०१७  रोजी तो सेवानिवृत्त झाला आहे. 

भंडारा जिल्ह्यातील सेंदुरवाफा (साकोली) ग्रामपंचायत सदस्याला २ ऑगस्ट २०१९ रोजी शिक्षा झाली आहे. त्याबाबत भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणCourtन्यायालय