२१ जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By Admin | Updated: May 25, 2016 04:35 IST2016-05-25T04:35:38+5:302016-05-25T04:35:38+5:30

तालुक्यातील केल्टे गावात एका व्यक्तीला पाच ते सहा जण मारहाण करीत असल्याने गावातील तिघे सोडवण्यास गेले असता त्यांनाही मारहाण केल्याने सहा जणांवर गुन्हा दाखल

21 people filed a complaint of atrocity | २१ जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

२१ जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

म्हसळा : तालुक्यातील केल्टे गावात एका व्यक्तीला पाच ते सहा जण मारहाण करीत असल्याने गावातील तिघे सोडवण्यास गेले असता त्यांनाही मारहाण केल्याने सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत जातीवाचक शिवीगाळ केल्याने एकवीस जणांवर गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.
म्हसळा तालुक्यातील केल्टे गावात २२ मेला गावातील गुरु नाथ गोपाळ जावळेकर याला मेढेकर फूड अँड ब्रेव्हरेज इंडस्ट्रीज कारखान्याचे मालक देवेंद्र हरिश्चंद्र मेढेकर यांचा सख्खा भाऊ जितेंद्र हरिश्चंद्र मेढेकर व कारखान्यात कामगार सौरभ केळसकर, राजेंद्र व अन्य पाच -सहा जण मारहाण करीत होते. यावेळी रमेश बाळाराम मेढेकर त्यांचे चुलत भाऊ आतिश अशोक मेढेकर व त्याचे सासरे मनोज जगन्नाथ पाटील हे तिघे त्यांना सोडवण्यासाठी गेले असता जितेंद्र हरिश्चंद्र मेढेकर यांनी त्यांना मारहाण केली. ही घटना केल्टे गावाचे पोलीस पाटील किसान देवजी पवार यांना सांगण्यासाठी गेले. मारहाणीचा प्रकार ग्रामस्थांना समजल्याने सर्व गावकरी मेढेकर यांच्या मेढेकर फूड अँड ब्रेव्हरेज इंडस्ट्रीज कारखान्याच्या समोर जमले असता देवेंद्र मेढेकर यांच्या कंपनीच्या भिंती मागून त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी दगडफेक केली. यामध्ये रमेश बाळाराम मेढेकर, रविना राजेश पवार, शांताबाई रामचंद्र भुवड, सविता सूर्यकांत कासरु ंग, महेश सहादेव कोबनाक, किसन गोविंद कासरु ंग असे सहा जण जखमी झाले. त्यांना म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले. रमेश बाळाराम मेढेकर (६४, रा. केल्टे , सध्या रा. मुंबई) यांनी फिर्याद दिल्यानंतर जितेंद्र हरिश्चंद्र मेढेकर, सौरभ केळसकर व अन्य पाच-सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील आरोपी जितेंद्र हरिश्चंद्र मेढेकर याचा सख्खा भाऊ व मेढेकर फूड अँड ब्रेव्हरेज इंडस्ट्रीज कारखान्याचे मालक देवेंद्र हरिश्चंद्र मेढेकर यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद दिल्याने रामचंद्र बोर्ले, गणेश बोर्ले, नितीन बोर्ले, अरु ण धाडवे, शंकर पवार, राजेश पवार, विनीत पवार, रमेश कासरुंग, पांडुरंग कासरुंग, विजय बोर्ले, ज्ञानेश्वर कोबनाक, गुरुनाथ जावळेकर, सागर शिगवण, रुपेश बोर्ले, अनंत कोबनाक, प्रसाद बोर्ले, हितेश कोबनाक, मुकुंद बोर्ले, प्रवीण कोबनाक, हेमंत बोर्ले, शैलेश सहदेव चव्हाण यांच्यावर अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक नलावडे करीत आहेत.

सात जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
रेवदंडा: मुरु ड तालुक्यातील पारगण ठाकूरवाडी आदिवासी वाडी येथे सात जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हरिश्चंद्र ठाकूर (रा.पारगण आदिवासी वाडी) व ग्रामस्थ यांच्या कब्जात असलेली वरील ठिकाणच्या वाडीवरील जमिनीभोवती काटेरी कुंपण मंगेश कुळवे, अरविंद अवैर, देवजी मांजरेकर, बाळाराम बडवे, सुनील पाचकुडे, पांडू पाचकुडे, वसंत कुळव यांनी तोडले.
यामुळे हरिश्चंद्र ठाकूर यांनी विचारणा केली असता हरिश्चंद्र ठाकूर हे आदिवासी (ठाकूर) समाजाचे आहेत हे माहीत असताना त्यांना वरील सात जणांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली आहे.
यामुळे ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियमाच्या सुधारित कलमानुसार सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.

Web Title: 21 people filed a complaint of atrocity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.