अलिबाग : येथील नामांकित डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या नावाचा गैरवापर करून तब्बल २० लाखांची आर्थिक फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याचा अन्य साथीदार फरार आहे. आरोपीने धर्माधिकारी यांचा मानस पुत्र असल्याचे सांगत अन्य काही जणांची फसवणूक केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.आरोपीने अलिबाग येथील स्वप्निल नामक फिर्यादीसह आई-वडिलांना मालवण येथे हॉटेल टाकून देतो असे सांगताना, माझे सचिनदादा धर्माधिकारी यांच्याशी खास संबंध आहेत. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा, तुम्हाला व्यवसायाचा मार्ग खुला करून देतो, असे सांगून फिर्यादीकडून एकूण २० लाख रुपये उकळले.ही घटना १३ आॅगस्ट २०१७ ते ४ डिसेंबर २०१८ या कालावधीत घडली आहे.
धर्माधिकारी प्रतिष्ठानचे नाव वापरून २० लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 05:53 IST