आमदारांना विकासासाठी २० काेटींचा निधी; निधी खर्च करण्याची क्षमता ७५ टक्क्यांपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:16 AM2021-01-02T00:16:00+5:302021-01-02T00:16:05+5:30

काेराेनाने जिल्ह्यात चांगलेच हातपाय पसरले.

20 kt funds for development of MLAs | आमदारांना विकासासाठी २० काेटींचा निधी; निधी खर्च करण्याची क्षमता ७५ टक्क्यांपेक्षा अधिक

आमदारांना विकासासाठी २० काेटींचा निधी; निधी खर्च करण्याची क्षमता ७५ टक्क्यांपेक्षा अधिक

Next

आविष्कार देसाई

रायगड: काेराेनामुळे विकासकामांना कात्री लागली हाेती. आता मात्र सरकारने निधी देण्याबाबत हात सैल केला आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा आणि तीन विधान परिषदेच्या आमदारांना आतापर्यंत एकत्रित २० काेटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. विकासकामांवर निधी खर्च करतानाच काेराेना राेखण्याच्या उपाययाेजनांसाठीदेखील जिल्ह्यातील ठरावीक आमदारांनी निधी वळता केला आहे.

काेराेनाने जिल्ह्यात चांगलेच हातपाय पसरले.  त्याला राेखण्यासाठी सरकार, प्रशासन विविध उपाययाेजना आजही आखत आहेत. काेराेनासाठी निधीची आवश्यकता असल्याने सुरुवातीला सरकारने ३३ टक्के निधी खर्च करण्याला परवानगी दिली हाेती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश विकासकामे खाेळंबली हाेती. आता निधी खर्च करण्याची मर्यादा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक केली आहे. त्यामुळे विकासकामांना गती येण्याची शक्यता आहे.

काेविडच्या उपाययाेजनांसाठी जिल्ह्यातील काही आमदारांनी निधी खर्च करण्याबाबत मंजुरी दिली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी (५० लाख रुपये), राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्री दिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थाेरवे, महाडचे शिवसेना आमदार भरत गाेगावले, शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांना मंजुरी दिली आहे.

रस्ते, पाणी, समाज मंदिर/ सभागृहावर
जिल्ह्यात विकासकामांना गती आली आहे. रस्ते, पाणीपुरवठा याेजना, समाज मंदिर, सभागृहाच्या उभारणीसाठी माेठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येत आहे. 
काेराेनाच्या उपाययाेजनांसाठीही आमदार निधीचा वापर करण्यात येत आहे. सुमारे दाेन काेटी काेराेनाच्या उपाययाेजनांसाठी वापरण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यातील १० आमदारांसाठी एकत्रित २० काेटींचा निधी आहे. त्यातील काही प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. पाणी, रस्ते, समाज मंदिरे, सभागृह याबाबतची अंदाजपत्रके आली आहेत. काेराेनाच्या उपाययाेजनांसाठीही काही आमदारांनी निधी दिला आहे. 
- जयसिंग मेहेत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी, रायगड

Web Title: 20 kt funds for development of MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.