शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत १८३ बालके कुपोषणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:44 IST

रायगड जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रयत्नांना‌ यश; आहाराची घेतली काळजी

ठळक मुद्देयावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती गीता जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तक पालन योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी मुलांना

लाेकमत न्यूज नेटवर्करायगड : कोरोना विषाणू प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर ताळेबंदी तसेच अनेक‌ निर्बंध असतानाही कुपोषित बालकांच्या आरोग्य व आहाराची काळजी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने लिलया पेलली. दत्तक पालन योजनेच्या माध्यमातून कुपोषित बालकांना घरपोच आहार पोहोचवल्यामुळे जुलै २०२० ते जानेवारी २०२१ या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील १८३ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रयत्नांना‌ यश आल्याचे बोलले जात आहे  .

रायगड जिल्ह्यात ८ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. त्यातच २४ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू झाला.  त्यामुळे अनेक निर्बंधांचा सामना प्रशासनासह नागरिकांना करावा लागला. परिणामी, एप्रिल आणि मे हे दोन महिने कुपोषित बालकांचे सर्वेक्षण झाले नव्हते. मार्चनंतर जून महिन्यापासून कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. जुलै महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात तीव्र कुपोषित ७६ तर सौम्य कुपोषित ५७६ अशी  ६५२ कुपोषित बालके आढळून आली. मात्र, लॉकडाऊनमध्ये सर्व यंत्रणा ठप्प झाली अनेक निर्बंध  आले. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती गीता जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तक पालन योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी मुलांना आहार दिला. कुपोषित मुलांच्या घरामध्येच बालविकास केंद्र सुरू केले. त्याचबरोबर गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून आहार कसा असावा आणि कसा द्यावा, याबाबतचे मार्गदर्शन करून आहार घरापर्यंत पोहोचविण्यात आला.जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे कुपोषण आटोक्यात आले. जानेवारी महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात तीव्र कुपोषित ५९ तर सौम्य कुपोषित ४१० अशी एकूण ४६९ बालके कुपोषित आढळून आली असून, सहा महिन्यात कुपोषित बालकांच्या संख्येत १८३ ने घट झाली असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली.

कुपोषित बालक कसे ठरविले जाते?जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दर महिन्याला बालकांचे वजन आणि उंची मोजली जाते. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने वयानुसार बालकांचे किमान वजन व उंची किती असली पाहिजे याचे निकष निश्चित केले आहेत. या निकषाच्या आत वजन आणि उंची भरल्यास, संबंधित बालक हे कुपोषित समजले जाते. 

कुपोषित बालके आकडेवारी  तालुका    जुलै     जानेवारी    घट/वाढअलिबाग     ४१         ३४     -७कर्जत     १२४       ९४     -३०खालापूर     ४०         ३२     -८महाड     ७५    ५२     -२३माणगाव     ७२        ६४     -८तळा     २५        १५     -१०म्हसळा     २३        २७     ४मुरुड     २४        १९     -५पनवेल     ३९        ५२     १३पेण     ५          ३     -२रोहा     ५२        २५     -२७पोलादपूर     २९        १९     -१०श्रीवर्धन     २४        १५     -९सुधागड     ६२        ३     -५९उरण     १७        १५     -२एकूण     ६५२      ४६९     -१८३

टॅग्स :Raigadरायगड