शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

१८१ कुपोषित बालकांची तपासणी

By admin | Updated: September 30, 2016 04:01 IST

कुपोषणमुक्तीसाठी जिल्हा परिषद काम करीत आहे. राज्य सरकारच्या निधीमधून आरोग्य विभागाकडून दर सहा महिन्यांनी राबविली जाणारी बाल विकास केंद्र ही योजना

नेरळ : कुपोषणमुक्तीसाठी जिल्हा परिषद काम करीत आहे. राज्य सरकारच्या निधीमधून आरोग्य विभागाकडून दर सहा महिन्यांनी राबविली जाणारी बाल विकास केंद्र ही योजना सध्या निधीअभावी बंद आहे. राज्य सरकारने बंद केलेली योजना जिल्हा परिषदेमार्फत सुरू करण्यासाठी खर्च केला जाईल, असे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती प्रिया मुकादम यांनी सांगितले. ग्रामपंचायतीकडे १० टक्के महिला बालकल्याणचा निधी असतो, तो निधी अन्य कोणत्याही कामासाठी खर्च न करता ग्रामपंचायत हद्दीमधील कुपोषित बालकांना अतिरिक्त आहार देण्यासाठी खर्च करण्याच्या सूचना केल्याची माहिती त्यांनी दिली. कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी महिला बालविकास विभाग आणि पनवेल येथील एमजीएम रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्र मांत सभापती सुवर्णा बांगरे, नेरळच्या सरपंच सुवर्णा नाईक, कोल्हारेचे उपसरपंच राजेंद्र विरले, तालुका प्रकल्प अधिकारी राजन सांबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, एमजीएमच्या डॉ. नकुल कोठारी उपस्थित होते. कुपोषित बालकांची पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात तपासणी करण्यात येणार आहे. (वार्ताहर)17,000 बालके कर्जत तालुक्यातील अंगणवाडीमध्ये येतात. त्यातील ४६ बालके अतिकुपोषित आणि १३५ तीव्र कुपोषित आहेत. तालुक्यात गेल्या महिन्यात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कारण जुलै २०१६ मध्ये अति आणि तीव्र कुपोषित बालकांची संख्या १५५ होती, ती तब्बल २६ ने वाढली आहे.