शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मांडवा बंदरातील कुस्ती स्पर्धांना दीडशे वर्षांची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:20 IST

खाऱ्या मातीत रंगतो आखाडा; हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, छत्रपती पुरस्कारप्राप्त कुस्तीपटूंचा आवर्जून सहभाग

- जयंत धुळप अलिबाग : ‘दंगल’ चित्रपटामुळे कुस्तीत जगप्रसिद्ध झालेल्या फोगट गर्ल्सचीच चुलत बहीण विनेश फोगट हिने सोमवारी इतिहास रचला. आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीचे सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला मल्ल ठरली. मात्र, या कुस्तीचे मूळ महाराष्ट्राच्या मातीत शेकडो वर्षांपूर्वी रुजले आहे. अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरावर समुद्रकिनारच्या खाºया मातीत नारळी पौणिमेच्या दिवशी होणाºया कुस्ती स्पर्धेने ‘कुस्ती’ या क्रीडा प्रकारास समाजमान्यता देऊन मोठे यश प्राप्त केले आहे.मांडवा बंदरावरील दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या कुस्ती स्पर्धांची कथा मोठी रोचक आहे. त्याकाळी अलिबाग-मुरुड तालुक्यांना जोडणारा साळाव पूल नव्हता. अलिबाग तालुक्यातील मांडवा हे बंदर मुंबई बंदराच्या सर्वात जवळचे बंदर होते. मांडवा बंदरात श्रमिक कामगारांकडून मालाची चढ-उतार होत असे तर बैलगाडीतून माल रेवदंड्याला आणि गलबतातून पलीकडे साळावला जात असे. त्याकाळी करमणुकीची साधने नसल्याने सण-उत्सवाचे औचित्य साधून खेळांचे आयोजन करण्याची संकल्पना कोकणात प्रसिद्ध होती. मांडवा बंदरात श्रमिक कामगारांसाठी, त्यांचे मनोरंजन तसेच ताकद वाढविण्यासाठी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली.मांडवा बंदरातील खाºया वाळूत नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून १५० वर्षांपूर्वी बैलगाडीवाल्यांनी वर्गणी काढून कुस्ती स्पर्धा सुरू करण्यात आल्याचे मांडव्याच्या टाकादेवी स्पोर्ट्स क्लबचे सचिव सुनील म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मांडव्याच्या बैलगाडीवाल्यांनी सुरू केलेल्या कुस्ती स्पर्धेत विजयी मल्लास रुमाल आणि बिल्ले अशी पारितोषिके त्याकाळात देण्यात येत असे. त्यानंतर आगरी-कोळी समाजाने स्पर्धांची पारितोषिके रोख आणि लाकडी ढाल अशा स्वरूपात देण्यास प्रारंभ केला.टाकादेवी स्पोटर््स क्लबने स्पर्धा आयोजित करण्यास प्रारंभ केल्यापासून पारितोषिके अधिकाधिक आकर्षित झाली. मोठ्या रोख पारितोषिकांबरोबरच घड्याळे आणि मेटल चषक अशा पारितोषिकांचा प्रारंभ झाला. गतवर्षी आव्हानाची कुस्ती तब्बल ७५ हजार रुपये रोख पारितोषिकाची झाली. मानाच्या आव्हानाच्या कुस्तीकरिता कुस्तीशौकिनांकडून संकलित होणाºया पारितोषिकांच्या रोख रकमेपैकी ७० टक्के विजयी कुस्तीपटूस तर ३० टक्के उपविजेत्या कुस्तीपटूस देण्याची आगळी परंपरा येथे असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.कालांतराने साळावच्या खाडीवरचा आणि अन्य पूल तयार झाले. दळणवळणाची साधने वाढली आणि बैलगाडीचा वापर बंदच झाला. परिणामी बैलगाडीवाल्यांनी सुरू केलेली ही कुस्ती स्पर्धा मांडवा पंचक्रोशीतील कोळी-आगरी समाज बांधवांनी वर्गणी काढून सुरू ठेवून परंपरा अबाधित राखली.कुस्तीच्या जोरावरच नोकरीसध्या राज्य परिवहन मंडळात वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले गजानन पाटील हे राष्ट्रीय कुस्तीपटू याच टाकादेवी स्पोर्ट्स क्लबचे सदस्य आणि सक्रिय कार्यकर्ते आहेत. पाटील यांच्याप्रमाणेच मांडवा पंचक्रोशीतील अनेक तरुणांनी व्यायामशाळेत शरीर कमावून कुस्तीपटू बनून जिल्हा,राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावून याच कुस्तीच्या जोरावर विविध कंपन्या आणि पोलीस दलात नोकºया संपादन केल्या आहेत.पुरस्कारप्राप्त कुस्तीपटूटाकादेवी स्पोर्ट्स क्लबच्यावतीने आयोजित कोकणातील १५० वर्षांपूर्वीच्या मांडव्याच्या बंदरातील खाºया वाळूतील कुस्तीचे आगळेपण संपूर्ण देशभरातील कुस्तीमल्लांच्या मोठ्या औत्सुक्याचा विषय बनले आहे.गेल्या २०-२५ वर्षांपासून देशातील हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, छत्रपती पुरस्कारप्राप्त कुस्तीपटू आवर्जून स्पर्धेत सहभागी होतात. या व्यतिरिक्त सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई आदी जिल्ह्यातील कुस्ती आखाड्यांतील कुस्तीपटू या नारळीपौर्णिमा कुस्ती स्पर्धेत मांडवा बंदरातील खारी माती अंगाला लावण्यात धन्यता मानतात.

टॅग्स :Raigadरायगड