शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यात 14 सेवा दवाखाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 11:41 IST

कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा निर्णय तिन्ही जिल्ह्यांत जागांचा शोध सुरू

नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात १४ ठिकाणी सेवा दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महामंडळाने तिन्ही जिल्ह्यात या सेवा दवाखान्यांसाठी जागांचा शोध सुरू केला आहे. यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत जागा मालकांकडून महामंडळाने  प्रस्ताव मागविले  आहेत.

महामंडळाच्या जूनमध्ये झालेल्या १८८ व्या बैठकीत देशभरात २३ नवीन १०० खाटांची रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यात महाराष्ट्रातील पालघर, सातारा, पेण, जळगाव, चाकण आणि पनवेल येथे सहा रुग्णालये उभारणार असल्याचे सांगितले होते. याच बैठकीत महाराष्ट्रात ४८ ठिकाणी दवाखाने सुरू करण्याचेही घोषित केले होते. त्यात १४ दवाखाने ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील आहेत. या दवाखान्यात विमाधारक कामगारांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना निवासस्थानाच्या जवळच्या परिसरात दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा असणार प्रयत्न आहे. 

येथे सुरू करणार सेवा दवाखाने

रबाळे, महापे, तुर्भे, नेरूळ, सरावली, डाेंबिवली, वसई, खारघर, पेण, तळोजा, रोहा, न्हावा-शेवा, उरण आणि  खालापूर अशा १४ ठिकाणे दवाखाने सुरू करणार आहेत. यातील सात दवाखाने नवी मुंबई-उरण परिसरातील आहेत.

 महामुंबई परिसरात राज्य कामगार विमा योजनेची वरळी, कांदिवली, मुलुंड, ठाणे, उल्हासनगर आणि वाशी येथे रुग्णालये आहेत. मात्र, आता ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील औद्योगिक वसाहतींच्या परिसरातच सेवा दवाखाने सुरू होणार आहेत. यामुळे कामाच्या ठिकाणीच वैद्यकीय मदत उपलब्ध होणार आहेत.

 सर्व भागांतील विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना, आयुष्मान भारत पीएमजेएवाय संलग्नीकृत रुग्णालयांद्वारे रोकड विरहित (कॅशलेस) वैद्यकीय सेवांचा लाभ देण्याचा निर्णयही यापूर्वीच झाला आहे.

यातील प्रत्येक दवाखान्यासाठी १,६०० चौरस फूट जागेचा शोध महामंडळाने सुरू केला आहे. याठिकाणी प्रत्येकी दोन डॉक्टर राहणार आहेत. तळमजल्यावरील जागेला प्राधान्य असून जागा मालकासोबत किमान तीन वर्षांचा करारनामा करण्यात येणार आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलthaneठाणेRaigadरायगड