जिल्ह्यात दोन अपघातांत १३ जखमी
By Admin | Updated: December 13, 2015 00:18 IST2015-12-13T00:18:03+5:302015-12-13T00:18:03+5:30
मॅजिक रिक्षा - स्विफ्ट कार या दोन वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन चालकांसह १० प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या मुंबई - गोवा महामार्गावर घडली.

जिल्ह्यात दोन अपघातांत १३ जखमी
नागोठणे : मॅजिक रिक्षा - स्विफ्ट कार या दोन वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन चालकांसह १० प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या मुंबई - गोवा महामार्गावर घडली. जखमींना पेण आणि अलिबागच्या रुग्णालयांत हलविण्यात आले आहे.
मॅजिक रिक्षा नागोठणेहून वडखळकडे, तर स्विफ्ट कार भिवंडीहून गोव्याकडे जात होती. अपघातात स्विफ्ट कारचालक भुवन पाटील (रा. कामतघर, भिवंडी) किरकोळ जखमी झाला. मॅजिक रिक्षाचालक पांडुरंग कदम (रा. कोलेटी), सुषमा घरत (रा. आमडोशी), हिराबाई शिद (रा. कातळावाडी), हार्दिक जाधव (रा. आमडोशी), सविता हंबीर (रा. राबगाव-नंबरवाडी), मनोज कदम (रा. कोंडवी), धर्मा हंबीर (चिंचवाडी-कोंडगाव), बुधी पारधी (रा.वाघेश्वर) आणि उमेश हंबीर (रा. वासगाव) यांना अलिबाग व पेणच्या रुग्णालयांत हलविण्यात आले आहे. (वार्ताहर)