शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महसूलचे ११३ कर्मचारी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:21 IST

८३ जण उपचारानंतर झाले बरे : रायगडमध्ये प्रादुर्भाव वाढत असला, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक

निखिल म्हात्रे।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, सरकारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने बाधित होत आहेत. महसूल खात्यात आजपर्यंत ११३ रुग्ण आढळले असून, ८६ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. २६ जण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर एका नायब तहसीलदारांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रहिवासी क्षेत्रातील नागरिकांसह डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी सफाई कामगार व इतर कोरोना योद्ध्यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली, परंतु कोरोनाने आपला मोर्चा शासकीय कार्यालयांकडे वळविला असून, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणूच्या दुष्ट चक्रात सापडत आहेत. कोरोना संसर्ग व त्याच्या साखळी तोडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याची बाधा होत असल्याने आता संसर्गाचा धोका वाढत चालला आहे.लॉकडाऊन कालावधीत नागरिकांची कामे कामे ताटकळत न राहण्यासाठी, तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य व पोलीस यंत्रणेसह महसूल विभाग अहोरात्र मेहनत घेत होता. अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याचे कामही महसूल विभागाने जवळून केल्याने त्यांना संसर्गाला सामोरे जावे लागले आहे. आणखीही महसूलचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेत आहेत.नागरिकांबरोबर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:ची काळजी घेण अत्यावश्यक आहे. कार्यालयात सोशल डिस्टंन्सचे पालन करून काम करणे गरजेचे आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची घेण्यासाठी स्वॅब टेस्ट, अ‍ॅन्टिजन टेस्ट घेण्यात आल्या आहेत, तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सी-व्हिटॅमिन टॅबलेट, मास्क व सॅनिटायजरही पुरविण्यात आले.- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगडनागरिकांनाचा निष्काळजीपणा घातक : महसूल अधिकारी व कर्मचाºयांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक असले, तरी बरे होण़्याचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्याची साखळी तोडण्यासाठी आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासन अहोरात्र मेहनत करीत आहे. मात्र, नागरिकांनाचा निष्काळजीपणा घातक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेऊनच काम करणे अत्यावश्यक आहे.नायब तहसीलदारांचा मृत्यूरायगड जिल्ह्यात आतापर्यंत २ प्रांताधिकारी, १ तहसीलदार, ४ नायब तहसीलदार, २८ तलाठी, १ लघू लेखक, २८ लिपिक, १६ अव्वल कारकून, ४ चालक, १४ शिपाई, ६ मंडळ अधिकारी, ६ कोतवाल, २ सफाई कामगार असे एकूण ११३ रुग्ण आढळले असून, ८६ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. २६ जण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर १ नायब तहसीलदारांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस