घरफोडी करणारे ११ जण अटकेत
By Admin | Updated: October 21, 2016 04:26 IST2016-10-21T04:26:41+5:302016-10-21T04:26:41+5:30
सिने कलाकार, राजकारणी, उद्योगपती यांचे फार्महाऊस कर्जतमध्ये आहेत. त्यामुळे या बंगल्यामध्ये धनिकांनी आपला काळा पैसा मोठ्या प्रमाणात लपवला आहे, अशी माहिती

घरफोडी करणारे ११ जण अटकेत
कर्जत : सिने कलाकार, राजकारणी, उद्योगपती यांचे फार्महाऊस कर्जतमध्ये आहेत. त्यामुळे या बंगल्यामध्ये धनिकांनी आपला काळा पैसा मोठ्या प्रमाणात लपवला आहे, अशी माहिती त्याच फार्महाऊसवर काम करणारे कामगार देत असल्याने फार्महाऊसमध्ये अनेक वेळा चोऱ्या झाल्याचे समोर आले आहे. असा प्रकार अडीच महिन्यांपूर्वी कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील एका फार्महाऊसवर झाला.
फार्महाऊसमध्ये १० कोटींपेक्षा जास्त काळा पैसा मालकाने लपवला आहे, असे सांगितल्याने तेथील कामगार व बाहेरील माणसांनी संगनमताने फार्महाऊस फोडले मात्र त्यांची फार मोठी निराशा झाली आणि फक्त ९० हजार हाती लागले. या प्रकारात पोलीस कोठडीत बसण्याची वेळ त्याच्यावर आली. यामध्ये कर्जत पोलिसांनी ११ जणांना अटक केली असून, अजून काही जणांचा पोलीस तपास करीत आहेत.
मुंबई येथे राहणारे आशिष जोशी यांचे कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथे फार्महाऊस आहे. या फार्म हाऊसवर १२ जुलै २०१६ रोजी चोरी झाली अशी तक्र ार त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्याप्रमाणे कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या घरफोडीचा तपास सुरु केला. तेंव्हा ही घरफोडी सिनेस्टाईलने झाली असल्याचे लक्षात आले.
जोशी यांच्या फार्महाऊसची तांबस येथील पंढरीनाथ गंगावणे हा देखरेख करत होता. त्याचा मित्र राजेंद्र शेळके हा त्याला भेटायला आला. त्यावेळी दोघांच्यात बंगल्याच्या तिजोरीत पैसा आहे अशी चर्चा झाली. राजेंद्र शेळके याने ही माहिती नवी मुंबई येथील एका राजकीय नेत्याच्या मुलास दिली. त्याने मुंबईमधील काही मित्रांना सांगितली. अशी ही माहिती पुढे गेली आणि मग या सर्वांनी मिळून १२ जुलै ला चोरी के ली. मात्र के वळ ९० हजार
रुपयांचाच ऐवज त्यांना
सापडला.
पोलिसांनी या प्रकरणी अण्णासाहेब देवडकर (रा. कळंबोली), मयूर घनवट (रा. कामोठे,) सचिन खुडे (रा. कामोठे), केतन चव्हाण (रा. काळाचौकी, मुंबई), गणेश मोरे (रा. लालबाग, मुंबई),गणेशा जाधव (रा. काळाचौकी), चंद्रकांत मोरे (रा. कांदिवली), राजेंद्र शेळके (रा. कर्जत), पंढरीनाथ गंगावणे (रा. कर्जत तांबस), प्रकाश बाईत (रा.मुंबई), राजेंद्र गडकर (रा.मुंबई) या अकरा जणांना अटक केली आहे. दोन चारचाकी जप्त केल्या आहेत. (वार्ताहर)