बलात्कार प्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 05:22 IST2017-11-22T05:22:04+5:302017-11-22T05:22:07+5:30
बलात्कार प्रकरणी पेण तालुक्यातील राम वाघमारेला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सोमवारी सुनावली

बलात्कार प्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी
अलिबाग (रायगड) : बलात्कार प्रकरणी पेण तालुक्यातील राम वाघमारेला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सोमवारी सुनावली. २ जानेवारी २०१६ रोजी रामने पेण तालुक्यातील केळीचीवाडी येथील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आजीने पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी रामला अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.