पनवेल मधील १० ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर; १८ डिसेंबरला मतदान
By वैभव गायकर | Updated: November 9, 2022 18:36 IST2022-11-09T18:35:48+5:302022-11-09T18:36:01+5:30
पनवेल:राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने दि.9 रोजी जाहीर करण्यात आल्या.रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश असून पनवेल तालुक्यातील ...

पनवेल मधील १० ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर; १८ डिसेंबरला मतदान
पनवेल:राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने दि.9 रोजी जाहीर करण्यात आल्या.रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश असून पनवेल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या निवडणुका यावेळी पार पडणार आहेत.
या दहाग्रामपंचायतीमध्ये शिवकर,नीतलस,भातान ,कांनपोली,दिघाटी,करंजाडे,शिरढोण,,चिंध्रन,केळवणे, नेरे आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.डिसेंबर मध्ये या निवडणूका पार पडणार असून दि.28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर ही उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर करायची मुदत आहे.18 तारखेला निवडणुका व 20 तारखेला या ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होणार आहे.दि.9 नोव्हेंबर पासुनच या ग्रामपंचायतींची आदर्श आचारसंहिता लागु होणार आहे.पनवेल तालुक्यात निवडणुकीची मालिका पुढील तीन ते चार महिने सुरु राहणार आहे.सध्याच्या घडीला पनवेल अर्बन बँक ची निवडणूक जाहीर झाली आहे.या पाठोपाठ ग्रामपंचायती निवडणुका,पनवेल महानगरपालिका,कोंकण शिक्षक मतदार संघ,कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढील काही महिन्यात पार पडणार आहेत.त्यामुळे आगामी काळात पनवेल मध्ये निवडणुकीची मालिका सुरु राहणार असल्याचे दिसून येत आहे