शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीच्या शाळांचे स्वच्छतागृहे मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 20:35 IST

निम्यापेक्षा जास्त शाळा १ हजार ३३४ स्वच्छता गृहांची हवी तातडीने दुरुस्ती 

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: जिल्हा परिषदेच्या जवळपास ३ हजार ६४८ शाळांपैकी जवळपास १ हजार ७९५ शाळांमधील स्वच्छता गृहांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. चांगले स्वछतागृह नसल्याने अनेक शाळांत विद्यार्थ्यांना नैसर्गिक विधी हे शाळेच्या आवारातच उरकावे लागत आहे, यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. १ हजार ७९५ पैकी १ हजार ३३४ स्वछता गृहांची तातडीने दुरुस्ती करणे हे गरजेचे आहे. 

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील मोडकळीस आलेल्या स्वच्छता गृहांची माहिती मुख्याध्यापकांकडून ऑनलाईन मागण्यात आली होती. त्यातून ही माहीती उघडकीस आली आहे. या शाळांमध्ये नैसर्गिक विधीसाठी मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र असे एक एक युनिट उभारण्यात आले आहे. मात्र, या स्वच्छता गृहांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ३ हजार ६४८ शाळांपैकी मुलांचे ६६४ तर मुलींच्या ६७० स्वछता गृहांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यांची तातडीने दुरुस्थीची गरज आहे. या स्वच्छता गृहांच्या दुरूस्ती साठी जिल्हा परिषदेने 7 कोटी 7 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तर नव्याने स्वछतागृह बांधण्यासाठी 12 कोटी 67 लाख 75 हजार असे 19 कोटी 75 लाख 70  हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच स्वछता गृहांच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली. 

तालुका  दुरवस्था झालेले स्वछता गृह    मोडकळीस आलेले स्वछतागृह 

आंबेगाव -            ८०                ३९

बारामती -            ८३                ४४भोर                     ९३               ६९दौंड -                   ९८               ३९हवेली                  १०१               ९इंदापूर                  ११७            ४६जुन्नर -                  १६०           ३४खेड   -                   १२४          ५७मावळ -                    १२३        १६मुळशी                  ९४            २१पुरंदर -                   १०२        ३३शिरूर                    ६९          २४ वेल्हे -                     ८९          ३०

जिल्हा परिषदेच्या एकुण शाळा -  ३६४८दुरवस्था झालेली  स्वच्छतागृहे - १७९५मोडकळीस आलेली स्वच्छतागृहे - ४६१तातडीची दुरुस्ती आवश्यक असलेली स्वच्छतागृहे - १३३४दुरुस्तीसाठी  निधी - ७ कोटी ७ लाख ९५ हजार रुपयेनव्याने स्वच्छतागृहे उभारणे - १२ कोटी ६७ लाख ७५ हजार रुपये 

शाळांतील नादुरुस्त असलेल्या स्वछतागृहांची माहिती मुख्याध्यापकांकडून मागवण्यात आली होती. त्यानुसार  1 हजार 795 स्वच्छता गृह नादुरुस्त असल्याची माहिती पुढे आली. तर काही ठिकाणी नव्याने उभारण्याची गरज आहे. 

स्वछतागृहांच्या  दुरुस्ती साठी आणि नव्याने स्वछतागृह बांधण्यासाठी  अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यानुसार  दुरुस्तीसाठी ७ कोटी सात लाख ९५ हजार रुपये तर, मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहांचे नव्याने बांधकाम करण्यासाठी १२ कोटी ६७ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद केली जाणार आहे. - रणजित शिवतरे, उपाध्यक्ष जिल्हा परिषद

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळा