पुणे : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी शनिवारी (दि. ७) ६८.३५ टक्के मतदान झाले. तर, सोमवारी (दि. ९) मतमोजणी होणार असून, जिल्ह्याचे राजकीय कारभारी कोण असतील, याचा फैसला होणार आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जुने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखणार की विरोधक सत्तांतर घडवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या मतमोजणीला सकाळी दहापासून सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्ह्यात १३ ठिकाणी स्वतंत्र मतमोजणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, आवश्यक ती सर्व तयारीची पूर्तता करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. वेल्हे येथे सर्वांत कमी तर जुन्नर तालुक्यात सर्वाधिक ४० टेबलांवर मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन तासांतच कल हाती येण्यास सुरुवात होईल, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील बहुतांश निकालाचे चित्र दुपारी दोन वाजेपर्यंत स्पष्ट होईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यात ७५ गटांपैकी ४४ गटांत विजय मिळवत पक्षाने एकहाती सत्ता मिळवली होती. त्याखालोखाल शिवसेनेने १३ जागांवर विजय मिळवला होता. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी ७ जागा मिळाल्या होत्या, तर अपक्ष आणि इतर पक्षांना मिळून ४ जागांवर यश मिळाले होते. मात्र, यंदाची राजकीय परिस्थिती बदललेली असल्याने निकालाची गणिते वेगळी ठरण्याची शक्यता आहे. मतमोजणी करताना गट व गण यांची एकत्रितच मोजणी केली जाणार आहे, त्यामुळे निकाल देताना गट व गणाचा एकाच वेळी मिळणार आहे. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेऊन अचूक व सुयोग्य पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्याकरिता काटेकोर नियोजन व रंगीत तालीम घेण्याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला आहे.
या ठिकाणी होणार मतमोजणी -
१. जुन्नर : श्री लेण्याद्री गणपती भक्त निवास भाग क्र. २, गोळेगाव (ता. जुन्नर)२. आंबेगाव : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, अवसरी खुर्द (ता. आंबेगाव)३. शिरुर : महाराष्ट्र वखार महामंडळ गोदाम, रांजणगाव एमआयडीसी, कारेगाव (ता. शिरुर)४. खेड : हुतात्मा शिवराव हरी राजगुरु, तालुका क्रिडा संकुल, तिन्हेवाडी (ता. खेड)५. मावळ : तहसील कार्यालय वडगाव मावळ६. मुळशी : राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिक शाळा, कासार आंबोली (ता. मुळशी)७. हवेली : सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, आंबेगाव बु. सेंट्रल लायब्रेरी समोर, पुणे
८. दौंड : शासकीय धान्य गोदाम, नगरमोरी चौंक (ता. दौंड)
९. पुरंदर : नवीन प्रशासकीय इमारत सासवड (ता. पुरंदर)
१०. वेल्हे : शासकीय धान्य गोदाम (ता. वेल्हे)११. भोर : कान्होजी जेधे, शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था, मांढर देवी रस्ता (ता. भोर)१२. बारामती : जिल्हा क्रिडा संकुल बॅडमिंटन हॉल (ता. बारामती)१३. इंदापूर : शासकीय धान्य गोदाम, कालठण रस्ता (ता. इंदापूर)
मतमोजणीसाठी एकूण २७७ टेबल ठेवण्यात आले असून टपाली मतपत्रिकांसाठी ४४ टेबल असतील. एकूण २११ फेऱ्या होणार आहेत. जुन्नर तालुक्यात सर्वाधिक ३२ टेबल ठेवण्यात आले असून मतमोजणीच्या १२ फेऱ्या होणार आहेत. इंदापूर तालुक्यात सर्वात कमी १४ टेबल असणार आहेत तर मोजणीच्या ३२ फेऱ्या असतील.
मतमोजणीच्या कामकाजासाठी पुरेशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निकालाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पर्याप्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
तालुका टेबल फेऱ्याजुन्नर ३२-- १२
आंबेगाव २०-- १५शिरूर २८-- १४
खेड १६-- ३१मावळ २०-- १७
मुळशी १७ -- १५हवेली २४-- १४
दौंड २१-- १७पुरंदर २१-- ११
राजगड १६-- ८भोर २०-- १३
बारामती २८-- १२इंदापूर १४-- ३२
Web Summary : Pune ZP election results today! Counting starts at 10 AM across 13 centers. All eyes are on whether NCP retains power or opposition wins. Expect clarity by afternoon.
Web Summary : पुणे ZP चुनाव के नतीजे आज! 13 केंद्रों पर सुबह 10 बजे से मतगणना शुरू। सबकी निगाहें इस बात पर हैं कि एनसीपी सत्ता बरकरार रखती है या विपक्ष जीतता है। दोपहर तक स्पष्टता की उम्मीद।