पुणे: राज्यभर सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला शनिवारी सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात सरासरी 7.74 टक्के मतदान नोंदवले गेले असून ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी लवकर हजेरी लावली.जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शांततेत मतदान सुरू असून प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे प्रक्रिया सुरळीत पार पडताना दिसत आहे. सकाळच्या थंड वातावरणाचा फायदा घेत नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्याचेही अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.इंदापूरमध्ये सर्वाधिक मतदान केंद्रेपुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका मतदान केंद्रांच्या संख्येत आघाडीवर असून येथे तब्बल 400 केंद्रे उभारण्यात आली आहेत. पहिल्या दोन तासांत येथे 7.68 टक्के मतदान झाले. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी केंद्रांचे योग्य नियोजन केल्याचे सांगितले जात आहे.जिल्ह्यात 3,605 मतदान केंद्रांची व्यवस्थानिवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाभरात एकूण 3,605 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. तालुकानिहाय केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:बारामती – 299मावळ – 243मुळशी – 227शिरूर – 337हवेली – 263दौंड – 317इंदापूर – 400पुरंदर – 235भोर – 237वेल्हे – 105आंबेगाव – 239जुन्नर – 366खेड – 337आदर्श व महिला मतदान केंद्रांवर विशेष भरप्रत्येक तालुक्यात एक असे 13 आदर्श व महिला मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. तसेच हवेली, भोर आणि इंदापूर तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक परदानशीन मतदान केंद्र सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे सर्व घटकांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला जात आहे. निवडणूक प्रशासनाने मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले असून दिवस पुढे सरकत असताना मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Pune district witnessed enthusiastic voting for ZP elections, with 7.74% turnout in the first two hours. Indapur leads with 400 polling centers. Authorities have established 3,605 centers across the district and are encouraging fearless participation.
Web Summary : पुणे जिले में ZP चुनावों के लिए उत्साहपूर्ण मतदान हुआ, पहले दो घंटों में 7.74% मतदान दर्ज किया गया। इंदापुर में सबसे अधिक 400 मतदान केंद्र हैं। अधिकारियों ने जिले भर में 3,605 केंद्र स्थापित किए हैं और निडर भागीदारी को प्रोत्साहित कर रहे हैं।