रांजणगाव गणपती : संपूर्ण शिरूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत रांजणगाव कारेगाव गटाच्या निवडणुकीत दुरंगी लढत होत आहे. रांजणगाव गणपती कारेगाव गटात तालुक्यात विक्रमी मतदान झाले झाले आहे. रांजणगाव गणपती गणात ८१.३७ टक्के तर कारेगाव गणात ८०.२५ टक्के मतदान झाले आहे. या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन पक्षांच्या महिला उमेदवारांमध्ये चुरशीची व थेट लढत होत आहे.
या गटातील दोन्ही महिला उमेदवार रांजणगावच्या असून, या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या जिल्हा परिषद गटात देवाची वाडी येथे बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या बाहेरच्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी त्याचा अहवाल शिरूरच्या निवडणूक अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
रांजणगाव गणपती येथे नवमतदारांसह दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. रांजणगाव गणपती येथील मतदान केंद्रांवर महसूल तसेच पोलिस यंत्रणा सर्व निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून होती. दिव्यांग मतदारांना व्हीलचेअरची व्यवस्था निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आल्याने दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावणे सोयीचे ठरले. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रांजणगाव गणपती कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे.
Web Summary : Ranjangaon Karegaon Zilla Parishad saw approximately 81% voter turnout. A fierce contest between NCP and BJP women candidates is anticipated. Police detained four individuals for alleged bogus voting at Devaachi Wadi. Voting went smoothly with security and facilities for disabled voters.
Web Summary : रांजणगाँव कारेगाँव जिला परिषद में लगभग 81% मतदान हुआ। राकांपा और भाजपा महिला उम्मीदवारों के बीच कड़ी टक्कर की उम्मीद है। देवाचि वाडी में कथित तौर पर फर्जी मतदान के लिए पुलिस ने चार लोगों को हिरासत में लिया। विकलांग मतदाताओं के लिए सुरक्षा और सुविधाओं के साथ मतदान सुचारू रूप से चला।