जिल्हा परिषदेच्या गट-गणांची फेररचना उद्या होणार जाहीर

By Admin | Updated: October 9, 2016 04:13 IST2016-10-09T04:13:46+5:302016-10-09T04:13:46+5:30

जिल्हा परिषदेच्या गट-गणांची अधिकृत फेररचना सोमवार (दि.१०) रोजी जाहीर करणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटांची फेररचना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, तर सर्व १३ पंचायत

Zilla Parishad's Group-wise repatriation will be announced tomorrow | जिल्हा परिषदेच्या गट-गणांची फेररचना उद्या होणार जाहीर

जिल्हा परिषदेच्या गट-गणांची फेररचना उद्या होणार जाहीर

पुणे : जिल्हा परिषदेच्या गट-गणांची अधिकृत फेररचना सोमवार (दि.१०) रोजी जाहीर करणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटांची फेररचना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, तर सर्व १३ पंचायत समित्यांच्या गणांची फेररचना सर्व तहसीलदार कार्यालय व पंचायत समित्यांच्या कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.
आरक्षण सोडत ५ आॅक्टोबर रोजीच काढण्यात आली. आरक्षण सोडत व फेररचनेवर
हरकती घेण्यासाठी २० आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना गट किंवा गणांबाबत काही हरकती व सूचना असतील, तर १० ते २० आॅक्टोबरदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत शाखा, विधान भवन येथे करण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Zilla Parishad's Group-wise repatriation will be announced tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.