जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येला घरघर!

By Admin | Updated: September 15, 2014 05:08 IST2014-09-15T05:08:46+5:302014-09-15T05:08:46+5:30

जुन्नर तालुक्यात शाळांच्या पटसंख्येला घरघर लागली असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात जुन्नर तालुका घटत्या पटसंख्येत क्रमांक एकवर आहे.

Zilla Parishad School Board | जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येला घरघर!

जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येला घरघर!

खोडद : जुन्नर तालुक्यात शाळांच्या पटसंख्येला घरघर लागली असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात जुन्नर तालुका घटत्या पटसंख्येत क्रमांक एकवर आहे. त्यातच २९ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी किंवा विद्यार्थी पटसंख्या टिकून राहावी म्हणून शासनाच्या वतीने ई-लर्निंग, सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, उपस्थिती भत्ता, मोफत गणवेश वाटप, आरोग्य तपासणी, मोफत शिक्षण या सारख्या विविध योजना राबवूनही पालकांचा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे ओघ कमी प्रमाणात आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या जुन्नर तालुक्यातच सर्वाधिक आहे. एकाच गावात वेगवेगळ्या पाच इंग्रजी माध्यमांच्या गाड्या डेरेदाखल होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र गावागावांमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये पाहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ७४८ शाळा असून या शाळांमधील १ लाख २२ हजार ८१३ मुले तर १ लाख १६ हजार ७१६ मुली शिक्षण घेत आहेत. मात्र जिल्ह्याची आकडेवारी पाहता विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी ११ हजाराने कमी होत आहे, भविष्यात ही बाब जिल्हा परिषद शाळा व शिक्षकांसाठी चिंताजनक ठरणार आहे. जुन्नर तालुक्यातील २९ शिक्षक तर खेड तालुक्यातील २ शिक्षक अतिरिक्त ठरत तालुकाबाह्य होत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Zilla Parishad School Board