शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या निवड पुन्हा लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 13:34 IST

नवीन पदाधिकारी आता नवीन वर्षातच

ठळक मुद्दे दरम्यानच्या काळात प्रशासकाची नियुक्तीपुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड कोणत्या तारखेला होणार याची उत्सुकता२१ डिसेंबरनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर किमान ७ ते १० दिवसांचा कालावधीराष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती

पुणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापती पदाची मुदत येत्या २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. ग्रामीण विकास विभागाकडून पुढील सूचना येईपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करु नका, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. नागपूर येथील पाच दिवसांचे अधिवेशन संपल्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने ८-१० दिवसांसाठी जिल्हा परिषदांवर प्रशासक नियुक्तीची वेळ शासनावर येणार आहे. राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला होता. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड कोणत्या तारखेला होणार याची उत्सुकता होती. यासंदर्भात बुधवारी ग्रामीण विकास विभागाच्या अवर सचिवांनी शासनाकडून सूचना येईपर्यंत या निवडणुकीचा कार्यक्रम किंवा तारखा घोषित करू नयेत, अशा सूचना दिल्या. येत्या २० डिसेंबरला पदाधिकाऱ्यांची मुदत संपणार आहे, यानंतरच पुढील सव्वा दोन वर्षांसाठी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरु करता येईल, असे मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीच्या तारखा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १६ ते २१ डिसेंबर दरम्यान आहे. मंत्री आमदार व प्रमुख नेते यात व्यस्त असल्याने २१ डिसेंबरनंतर पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेण्याबद्दलच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. यामुळे २१ डिसेंबरनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर किमान ७ ते १० दिवसांचा कालावधी लागेल.........राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखतीपुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद बहुमत आहे. आगामी सव्वा दोन वर्षांसाठी पदाधिकारी निवडी करता १३ डिसेंबरपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. त्यानंतर १४ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे अध्यक्ष बंगल्यावर इच्छुकांच्या मुलाखती घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.......

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक