शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Pune ZP Election 2026: पुणे जिल्ह्यात २९ लाखाहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:35 IST

Pune Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेच्या ७३ गट व पंचायत समितीच्या १४६ गणाकरिता शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान करता येणार आहे

पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर फेब्रुवारी ९ रोजी मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार आहे. मतदारांनी निवडणुकीकरिता उर्त्स्फूतपणे मतदान करावे, नागरिक व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करून शांततेत पूर्ण प्रक्रिया पार पाडावी, संपूर्ण निवडणुकीच्या कामकाजाकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

जिल्हा परिषदेच्या ७३ गट व पंचायत समितीच्या १४६ गणाकरिता शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० असून मतदानापुर्वी मॉक पोल घेतला जाणार आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारी  रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुणे जिल्ह्यात २९ लाखाहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क 

जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्र असून याअंतर्गत पुरुष १५ लाख २७ हजार १५१, स्त्री १४ लाख ४९ हजार ५६० आणि इतर ९४ असे एकूण २९ लाख ७६ हजार ८०५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. निवडणूक कामकाजाकरिता २३ हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत सर्व मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आदी अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून संपूर्ण निवडणूक कामकाजाकरिता एकूण २३ हजार ११४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली  आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलींग पार्टी सर्व साहित्यासहित आपआपल्या मतदान केंद्रावर पोहोचल्या असून मतदान प्रक्रियेसाठी सुसज्ज आहेत. निवडणूकीच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत. मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत मतदानाची टक्केवारीत वाढ होण्याकरिता विविध प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले आहे.

मतदानाकरिता सार्वजनिक सुट्टी

मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यक्षेत्रात ३ फेब्रुवारीच्या महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेद्वारे शनिवार, ७ फेब्रुवारी  रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सार्वजनिक सुट्टी मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना सुद्धा लागू राहील. केंद्र शासनाच्या शासकीय, निम्न शासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम बँका आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाकरिता जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्र 

बारामती तालुक्यात २९९, मावळ २४३, मुळशी २२७, शिरुर ३३७, हवेली २६३, दौंड ३१७, इंदापूर ४००, पुरंदर २३५, भोर २३७, वेल्हे १०५, आंबेगाव २३९, जुन्नर ३६६ आणि खेड ३३७ तालुक्यात असे एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्र आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ आदर्श व महिला मतदान केंद्र तसेच हवेली, भोर आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी १ याप्रमाणे ३ परदानशीन मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेकरिता  १४ हजार ३१८ बॅलेट युनिट, ५ हजार ८१३ कंट्रोल युनिट यंत्र, मेमरी चीप ३ हजार ९६८, बॅटरी ३ हजार ९९१ वितरित करण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Zilla Parishad Election: Over 29 Lakh Voters to Participate

Web Summary : Pune's Zilla Parishad election on February 7th sees over 29 lakh voters eligible. The administration is ready with 3,605 polling centers. A public holiday is declared to encourage voting. Counting will be held on February 9th, after a mock poll.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५zpजिल्हा परिषदElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcollectorजिल्हाधिकारीVotingमतदान