पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी सुटी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ, मुळशी, शिरूर, हवेली, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर आणि खेड या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचारी, तसेच कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या ३० जानेवारी २०२६ च्या परिपत्रकानुसार कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने-खासगी कंपन्या, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार-औद्योगिक उपक्रम, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स आदींमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी व कामगारांना भरपगारी सुटी देणे बंधनकारक आहे. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी शक्य नसेल, तर दोन ते तीन तासांची सवलत देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकानांचे मालक व व्यवस्थापन यांनी परिपत्रकातील निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदानासाठी भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास, संबंधित आस्थापनांविरुद्ध निवडणूक आयोग व शासनाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील कोणत्याही आस्थापना, कारखाना किंवा दुकानामध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी अथवा सवलत न मिळाल्यास त्यांनी कामगार उपआयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Web Summary : Pune district administration declared a paid holiday on February 7th for workers in industries, establishments, and factories to exercise their voting rights in the Zilla Parishad elections. Employers must comply, or face action. Workers can complain to the Labour Deputy Commissioner if denied leave.
Web Summary : पुणे जिला प्रशासन ने जिला परिषद चुनावों में श्रमिकों को मतदान करने के लिए 7 फरवरी को सवैतनिक अवकाश घोषित किया। नियोक्ताओं को पालन करना होगा, अन्यथा कार्रवाई की जाएगी। छुट्टी से वंचित रहने पर श्रमिक श्रम उपायुक्त से शिकायत कर सकते हैं।