पुणे : संपूर्ण राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे या निवडणुकीचे मतदान पुढे ढकलण्यात आले होते. बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी पुणे जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. लोकशाहीचा पवित्र उत्सव उत्साहात साजरा करताना मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कर्तव्य बजावावे, नागरिक व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे आणि पात्र मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत केले.जिल्हा परिषदेच्या ७३ गट व पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी आज शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असून, मतदानापूर्वी मॉक पोल घेतला जाणार आहे. मतदानाच्या दिवशी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक किंवा समाज माध्यमांत कोणत्याही प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत........................................मतदानासाठी सार्वजनिक सुट्टीमतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ३ फेब्रुवारीच्या अधिसूचनेनुसार शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व बँकांनाही ही सुट्टी लागू असेल. अधिकाधिक मतदारांनी मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डूडी यांनी केले...............................................इंदापूरमध्ये सर्वाधिक मतदान केंद्रेपुणे जिल्ह्यात एकूण ३,६०५ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून त्यात बारामती २९९, मावळ २४३, मुळशी २२७, शिरूर ३३७, हवेली २६३, दौंड ३१७, इंदापूर ४००, पुरंदर २३५, भोर २३७, वेल्हे १०५, आंबेगाव २३९, जुन्नर ३६६ आणि खेड ३३७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ आदर्श व महिला मतदान केंद्रे, तसेच हवेली, भोर व इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एक परदानशीन मतदान केंद्र असणार आहे.....................................२९ लाखांहून अधिक मतदारनिवडणुकीसाठी जिल्ह्यातील २९ लाख ७६ हजार ८०५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष १५,२७,१५१, महिला १४,४९,५६० आणि इतर ९४ मतदारांचा समावेश आहे..................................२३ हजारांहून अधिक कर्मचारी तैनातनिवडणूक प्रक्रियेसाठी १४,३१८ बॅलेट युनिट, ५,८१३ कंट्रोल युनिट, ३,९६८ मेमरी चीप व ३,९९१ बॅटऱ्या वितरित करण्यात आल्या आहेत. सर्व मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी नियुक्त असून, एकूण २३,११४ अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी कार्यरत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पर्याप्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, मतदान जनजागृती अभियानाद्वारे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत......................................९ फेब्रुवारीला मतमोजणी९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांतता, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.
Web Summary : Zilla Parishad and Panchayat Samiti elections are underway after postponement. Pune's 73 ZP groups and 146 PS constituencies vote. Public holiday declared for voting. Over 29 lakh voters participate; counting on February 9th.
Web Summary : जिला परिषद और पंचायत समिति चुनाव स्थगित होने के बाद शुरू। पुणे के 73 जेडपी समूहों और 146 पीएस निर्वाचन क्षेत्रों में मतदान। मतदान के लिए सार्वजनिक अवकाश घोषित। 29 लाख से अधिक मतदाता भाग लेंगे; मतगणना 9 फरवरी को।