वडगाव मावळ : मावळ तालुक्यात भाजप-शिंदेसेना युतीची जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीच्या दहा गणांसाठी उमेदवारी यादी भाजपचे कोअर कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती शेटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
मावळ तालुक्यात भाजप व शिंदेसेनेची युती झाली असून, पंचायत समिती टाकवे गणाची जागा शिंदेसेनेला सोडली आहे. उर्वरित सर्व ठिकाणी भाजपने उमेदवार उभे केले आहेत. यावेळी भाजपचे निवडणूक प्रचारप्रमुख बाळासाहेब नेवाळे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, अविनाश बवरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबूराव वायकर, शांताराम कदम, शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख रामभाऊ सावंत, अभिमन्यू शिंदे उपस्थित होते.
जिल्हा परिषद गटाचे उमेदवार
टाकवे-नाणे गट -मधुकर कोकाटे
इंदुरी - वराळे गट- मेघा भागवत
कार्ला -खडकाळा गट -आशाताई वायकर
कुसगाव बुद्रुक- काले गट -दत्तात्रय गुंड
सोमाटणे- चांदखेड गट -शीतल गराडे
-------------
पंचायत समिती गणाचे उमेदवार
टाकवे गण -अश्विनी कोंडे
नाणे गण- संगीता आढारी
वराळे गण- रवींद्र शेटे
इंदोरी गण- श्रीकृष्ण भेगडे
खडकाळा गण - प्रकाश गायकवाड
कार्ला गण- रंजना गायकवाड
कुसगाव बुद्रुक गण- नवनाथ हरपुडे
काले गण- सीमाताई ठाकर
चांदखेड गण -सुवर्णा घोटकुले
सोमाटणे गण- बाळासाहेब पारखी
Web Summary : BJP-Shinde Sena alliance declared candidates for Zilla Parishad and Panchayat Samiti elections in Maval. The alliance sees BJP contesting most seats, with Shinde Sena allocated the Takve Gana seat.
Web Summary : मावल में भाजपा-शिंदे सेना गठबंधन ने जिला परिषद और पंचायत समिति चुनावों के लिए उम्मीदवारों की घोषणा की। गठबंधन में भाजपा अधिकांश सीटों पर चुनाव लड़ रही है, जबकि शिंदे सेना को टाकवे गण सीट आवंटित की गई है।