जिल्हा परिषदेचा कृषिनिष्ठ पुरस्कार कुंजीर यांना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:23+5:302021-07-20T04:09:23+5:30
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना, तालुका पंचायत समितीच्या शिफारशीने, जिल्हा परिषदेकडून आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार दरवर्षी तालुक्यातील ...

जिल्हा परिषदेचा कृषिनिष्ठ पुरस्कार कुंजीर यांना जाहीर
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना, तालुका पंचायत समितीच्या शिफारशीने, जिल्हा परिषदेकडून आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार दरवर्षी तालुक्यातील एका शेतकऱ्याला दिला जातो. पुरस्काराचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केले जाते. परंतु मागील वर्षीपासून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. यावर्षीचे पुरस्कारही भरगच्च कार्यक्रम न घेता, शेतकऱ्यांच्या गावातील ग्रामपंचायतीत जाऊन दिले जाणार आहेत.
विजय कुंजीर यांनी उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पॉलीहाऊसमधील ऑरचिड, अँथोरिअम, फिनॉलॉपसिस यासारख्या हायटेक फुलशेतीकडे वळत फुलांची-झाडांची आयात-निर्यात करून जिल्ह्यात नावलौकिक केला आहे. कुंजीर यांच्या निवडीने थेऊरमधील शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले. तसेच पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल कुंजीर यांनी, हवेली पंचायत समितीचे व पुणे जिल्हा परिषदेचे आभार मानले.