झेडपीमध्ये पुन्हा झिरो पेन्डसी सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:07 IST2021-01-01T04:07:29+5:302021-01-01T04:07:29+5:30
पुणे : जिल्हा परिषदेची प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावण्यसाठी तसेच विविध कागदांचा निपटारा करण्यासाठी नव्या वर्षात जिल्हा परिषद ...

झेडपीमध्ये पुन्हा झिरो पेन्डसी सुरु होणार
पुणे : जिल्हा परिषदेची प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावण्यसाठी तसेच विविध कागदांचा निपटारा करण्यासाठी नव्या वर्षात जिल्हा परिषद पुन्हा झिरो पेन्डसी कार्यक्रम सुरू करणार आहे. या साठी पंचसुत्री कार्यक्रम राबविला जाणा आहे. याची सुरूवात उद्या १ जानेवारी पासून करण्यात येणार आहे. यामुळे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होणार आहे.
जिल्हापरिषदेचे काम वेगवान करण्यासाठी झीरो पेन्डसीचा प्रकल्प जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कायर्कारी अधिकारी सुरज मांढरे यांनी २०१६ मध्ये
राबविला होता. त्या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मोहिमेमुळे अनेक वर्षापासूनची जिल्हा परिषदेतील प्रलंबीत प्रकरणे निकाली लागली होती. या सोबतच हजोरो किलो कागदपत्रांची अनावश्यक रद्दीही बाजुला काढण्यात आली होती.
प्रशासकीय व जनतेची कामे वेळेत होण्यासाठी आणि प्रशासकीय कामातील विलंब टाळण्यासाठी तसेच प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांनी सुचना दिल्या होत्या. त्यांच्या सुचनेनुसार झिरो पेंडन्सीची मोहिम जिल्हा परिषद प्रशासन मुख्यालायात राबविणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग, पंचायत समिती आणि सर्व क्षेत्रीय कायार्लायमध्ये उद्या शुक्रवारी १ जानेवारीपासून ही मोहिम राबविण्यासाठी पंचसुत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ही मोहीम १५ जानेवारीपर्यंत राबविण्यात येईल. या मोहीमेसाठी समन्वयक अधिकारी म्हणून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
चौकट
जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर २००० नंतरची कागदपत्रे ठेवण्यात आलेली आहेत. तर त्या पूर्वीची अनेक वर्षापूर्वीची कागदपत्रे मार्केट यार्ड येथील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी रेकाॅर्ड उपलब्ध करून वर्गवारी करणे सोपे जावे यासाठी जुन्या इमारतीतील कागदपत्रे मार्केट यार्डातील गोडाऊनमध्ये हलवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याठिकाणीच वर्गवारी केली जाणार आहे. त्यामुळे जुन्या जिल्हा परिषदेतील जागा रिकामी होईल.
चौकट
ही पंचसुत्री राबविणार
झिरो पेंडन्सी मोहीमे अंतर्गत प्रलंबीत प्रकरणांचा निपटारा करणे, कार्यालयातील कागदपत्रांचे वर्गीकरण करणे, अभिलेख तसेच अभिलेख कक्षाचे अद्यावयातीकरण, लेखापरीक्षण पूर्तता, न्यायालयीन सद्यस्थितीचा आढावा, या पंचसुत्री कार्याक्रमाचा समावेश आहे.