शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात झीरो पेंडन्सी प्रभावी : चंद्रकांत दळवी; महसूल विभागाच्या कामाचा घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 12:17 IST

दळवी यांनी जिल्ह्यातील झीरो पेंडन्सीच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, नीलिमा धायगुडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे उपजिल्हाधिकारी, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. 

ठळक मुद्देझीरो पेंडन्सीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे कामाचा ताण कमी होण्यास मदत : चंद्रकांत दळवी नेमाडे यांनी एक पत्र लिहून विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे मानले आभार

पुणे : पुणे जिल्ह्यात महसूल विभागाने राबविलेल्या झीरो पेंडन्सीमध्ये प्रभावी काम झाले असून त्यामुळे काम घेऊन कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे. लोकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केली. दळवी यांनी जिल्ह्यातील झीरो पेंडन्सीच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे,  समन्वयक उपजिल्हाधिकारी नीलिमा धायगुडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे उपजिल्हाधिकारी, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. दळवी म्हणाले, ‘झीरो पेंडन्सीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे कामाचा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. सर्वसामान्यांची कामे वेळेत पूर्ण होतील. प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. येत्या डिसेंबरअखेर जिल्ह्यातील महसूल विभागात झीरो पेंडन्सी होणार आहे. हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असला तरी डेली डिस्पोजलचे कामही वेगाने आणि सातत्याने होणे आवश्यक आहे. या कामात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. सामान्य लोकांनाही शासनाच्या आणि प्रशासनाच्या प्रती आदर निर्माण होणार आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे दळवी म्हणाले. यावेळी बैठकीत उपस्थित अधिकाºयांनी विविध शंकांचे निरसरण करून घेतले़

‘कोसला’कार भालचंद्र नेमाडेंनी मानले आभारज्ञानपीठ पुरस्कारविजेते, कोसलाकार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या पुण्यातील फ्लॅटच्या नोंदणीचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. झीरो पेंडन्सी अभियानामुळे हे काम अत्यंत कमी वेळेत झाले. प्रशासनात झालेल्या सकारात्मक बदलामुळे प्रभावित झालेले नेमाडे यांनी एक पत्र लिहून विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे आभार मानून झीरो पेंडन्सी अभियानाचे कौतुक केले.

टॅग्स :Puneपुणे