तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: March 22, 2017 03:34 IST2017-03-22T03:34:41+5:302017-03-22T03:34:41+5:30
शहरातील मध्यवस्तीत शनिवारवाडा परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली़

तरुणाची आत्महत्या
पुणे : शहरातील मध्यवस्तीत शनिवारवाडा परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली़ ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, त्याच्या मृतदेहावरील जखमांवरून हा खून असावा, असा अंदाज बांधला जात होता; मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
हा तरुण २५ ते २८ वर्षांचा असून, त्याची अद्याप ओळख पटू शकली नाही. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शनिवारवाड्याजवळ असलेल्या सूर्या हॉस्पिटलजवळ जुनी गुलमोहर सोसायटी आहे.
मंगळवारी सकाळी एक व्यक्ती येथे रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली.
पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला आहे.