जिवंत देखावे सादरीकरणातून मिळाला तरुणांना रोजगार

By Admin | Updated: August 25, 2014 05:26 IST2014-08-25T05:26:21+5:302014-08-25T05:26:21+5:30

शिक्षण, नोकरी करून पथकात कला सादर करणारे अनेक तरुण-तरुणी ग्रुपमध्ये आहेत. १५ वर्षांपासून ते ज्येष्ठांपर्यंतचा समावेश आहे.

Youths get employment from living presentations | जिवंत देखावे सादरीकरणातून मिळाला तरुणांना रोजगार

जिवंत देखावे सादरीकरणातून मिळाला तरुणांना रोजगार

>पिंपरी - शिक्षण, नोकरी करून पथकात कला सादर करणारे अनेक तरुण-तरुणी ग्रुपमध्ये आहेत. १५ वर्षांपासून ते ज्येष्ठांपर्यंतचा समावेश आहे. दिवसा महाविद्यालय किंवा नोकरी करुन सायंकाळी सरावात सहभाग घेतात. मानधनापेक्षा कला सादर करण्याची संधी मिळत असल्याने त्यांचा उत्साह दांडगा आहे. 
मंडळाचे कार्यकर्तेही
■ भरमसाट रक्कम देणे परवडत नसल्याने काही मंडळांतील कार्यकर्ते स्वत:च देखावा तयार करतात. त्यांना प्रशिक्षण देऊन आपल्या पद्धतीने देखावा सादर करतात. अशा मंडळांची संख्या वाढत आहे. असे प्रयोग करणार्‍या मंडळांना नागरिकांचे प्रोत्साहन मिळत आहे. 
ज्वलंत विषयावर भर
■ माळीणगावच्या आपत्तीवर मी डोंगर बोलतोय, परदेशी वस्तू, साहित्य, खते, झाडे आदीचा वापर थांबवून, स्वदेशीचा मंत्र स्वीकारा, लाभले भाग्य बोलतो मराठी, विभक्त कुटुंबपद्धतीचे तोटे दर्शविणारे माणुसकी, कोळी बांधवांची जीवनपद्धती सांगणारी कोळीवाडा, बदलत्या राज्यावर भाष्य करणारा बदलता महाराष्ट्र, मराठी व हिंदी गाण्याचे फ्युजन, स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरण आदी ज्वलंत विषयांबरोबरच सामाजिक आणि विधायक विषयावर प्रबोधन करणारे देखावे आहेत.

Web Title: Youths get employment from living presentations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.