पाण्यासाठी सरसावले युवक

By Admin | Updated: March 22, 2016 01:33 IST2016-03-22T01:33:09+5:302016-03-22T01:33:09+5:30

राज्यात दुष्काळी स्थिती अधिक भीषण झाली आहे. शहरालाही त्याची झळ लागत आहे. एक दिवसाच्या पाणी पुरवठ्यात कपात सुरू केली

The youth who came to water | पाण्यासाठी सरसावले युवक

पाण्यासाठी सरसावले युवक

निगडी : राज्यात दुष्काळी स्थिती अधिक भीषण झाली आहे. शहरालाही त्याची झळ लागत
आहे. एक दिवसाच्या पाणी पुरवठ्यात कपात सुरू केली आहे. पाणी काटकसरीने वापरून बचतीसाठी वेगवेगळे मार्ग
अमलात आणले जात आहेत. या दृष्टीने शहरातील काही तरुणांनी पाणी बचत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. स्वच्छतागृहातील फ्लश टॅँकमध्ये बाटल्या ठेवून पाणी वाचवून ‘स्मार्ट होम’चे आवाहन ते करीत आहेत.
संकेत उपासनी, डॉ. विजय वाळेकर, सूरजसिंग पानेसर, विश्वंभर देशमुख हे प्राधिकरण, निगडीतील सामाजिक
कार्यकर्ते आहेत. त्यांनी एकत्रित येऊन जागतिक पाणी दिवसानिमित्त ‘पाणी बचत मोहीम’ हाती घेतली आहे. प्राधिकरण, निगडी येथील पेठ २६ येथील घरामध्ये जाऊन ते या संदर्भात माहिती देत आहेत. (प्रतिनिधी)
सध्या प्रत्येक घरातील स्वच्छतागृहात फ्लॅश टॅँक असतात. त्यांचे आकार मोठे असल्याने त्यात भरपूर पाणीसाठा होता. त्याचा आकार कमी केल्यास पाण्याची बचत होणार आहे. काही जण टाकीचा आकार छोटा करून घेतात. त्यासाठी प्लंबरची गरज लागते. ही बाब खर्चिक आहे. प्लॅस्टिकच्या पाण्याचा २५० मिलिलिटरच्या २ बाटल्या ठेवल्यास एका फ्लॅशला ५०० लिटर म्हणजे अर्धा लिटर पाणी वाचणार आहे.
> गिर्यारोहक, खेळाडूंचाही उपक्रम
पिंपरी-चिंचवड माउंटेनिअरिंग क्लबच्या खेळाडूंतर्फे पाणीबचतीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शिक्षण, प्रशिक्षक, खेळाडू आणि नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून दिले जात आहे. पाणी व रंगविरहीत होळी साजरी करून पाणी वाचविण्याचे शपथ ते नागरिकांना देत आहेत. हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पाणी आणि रंगविरहीत होळी खेळल्यास त्या दिवशी वाया जाणारे लाखो लिटर पाणी वाचणार आहे. याची दखल घेत यमुनानगर, निगडी येथील अमृता विद्यालय व सेंट अ‍ॅण्ड्र्युज स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पाणीबचतीची शपथ देण्यात आली. या मोहिमेसाठी एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांनी पुढाकार घेतला आहे.
> ‘आर्किमिडीज’च्या तत्त्वावर आधारित ही अत्यंत सोपी आणि अतिशय उपयुक्त संकल्पना आहे. स्टिकर नसलेल्या २५० मिलिलिटरच्या दोन बाटल्या पाण्याने पूर्णपणे भरून त्या झाकणाने घट्ट बंद केल्या जातात. ‘बॉल कॉक व्हॉल्व्ह’ला कोणताही अडथळा न आणता फ्लश टॅँकमध्ये या दोन्ही प्लॅस्टिकच्या बाटल्या आडव्या ठेवल्या जातात. या तऱ्हेने काही क्षणांत स्मार्ट फ्लश टॅँक तयार होतो. प्रत्येक वापराच्या वेळी अर्धा लिटर पाणी वाचते. एका घरात तीन सदस्य असतील, तर २ वेळा फ्लश टॅँक वापरल्यास दिवसाला तीन लिटर पाणी वाचते. अशी माहिती घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांनी दिली.असे स्मार्ट फ्लश टॅँक त्यांनी नागरिकांना मोफत करून दिले. या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले. या माध्यमातून प्लॅस्टिकच्या बाटल्याचा कचरा कमी होणार आहे. कार्यकर्त्यांनी दिवसभरात एकूण ५० घरांमध्ये या प्रकारे स्मार्ट फ्लॅश टॅँक बनविले. नागरिकांच्या सहमतीने त्याच्या घराचे दरवाजे आणि पोस्ट बॉक्सवर ‘आम्ही करणार पाण्याची बचत’ असे स्टिकर्स लावण्यात येणार आहेत.
> ‘स्मार्ट फ्लॅश टॅँक’या संकल्पनेबाबत संपूर्ण शहरभरात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्यास लाखो लिटर पाणी बचत होणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयात या उपक्रमाबाबत माहिती दिली गेली पाहिजे. अत्यंत सोपी आणि विनाखर्चिक ही संकल्पना आहे. काही क्षणांत त्यांची अंमलबजावणी होते. दररोज थेट नाल्यात जाणारे स्वच्छ पाणी या माध्यमातून वाचणार आहे. - संकेत उपासनी

Web Title: The youth who came to water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.