जळीतकांडप्रकरणी तरुणाला अटक
By Admin | Updated: July 5, 2015 00:35 IST2015-07-05T00:35:45+5:302015-07-05T00:35:45+5:30
सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या जाळपोळीप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. सिंहगड रस्ता भागातच

जळीतकांडप्रकरणी तरुणाला अटक
पुणे : सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या जाळपोळीप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. सिंहगड रस्ता भागातच राहणाऱ्या या संशयितावर यापूर्वीचेही वाहन जाळपोळीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिली. अमन अब्दुलगनी शेख (वय ३२, रा. साई पॅलेस, ५५/७, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सनसिटी, आनंदनगर आणि नऱ्हे परिसरात २८ जून रोजी पहाटे तब्बल ८४ दुचाकी आणि ६ चारचाकी वाहनांना त्याने आग लावली होती. लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आत्मचरण शिंदे यांना शेख याच्याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी परिमंडल दोनचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांना याबाबत माहिती दिली. डॉ. पठारे आणि शिंदे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम, पोलीस निरीक्षक राम राजमाने यांना आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, संतोष क्षीरसागर, दीपक मते, दीपक मोदे यांनी वडगाव बुद्रुक येथील साई पॅलेस इमारतीमध्ये असलेल्या दुकानामधून शेख याला उचलले. (प्रतिनिधी)