शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मराठी मुलीचे सरंक्षण करणे आमची जबाबदारी म्हणणाऱ्या भाईनेच केले तरुणाचे अपहरण

By विवेक भुसे | Updated: August 20, 2022 19:30 IST

खात्यातून पैसे काढून घेऊन २० लाखांची खंडणी मागितली...

पुणे : मराठी मुलींचे सरंक्षण करण्याची आमची जबाबदारी आहे, असे म्हणणाऱ्या स्वयंघोषित भाईने ऑफिसमधील महिलेशी चॅट करतो, या कारणावरुन भेटायला बोलावून तिघांनी तरुणाचे अपहरण करुन त्याला कोपरगावला नेले. त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेऊन २० लाखांची खंडणी मागितली. त्याने बाथरुमच्या बहाण्याने स्वत:ची सुटका करुन घेतली. शिर्डी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.लहु विष्णु जाधव (वय २९, रा. अहमदनगर), महेश भाऊसाहेब कोटमे (वय २७, रा. नाशिक) आणि मंगेश माणिक भाबड (वय ३७, रा. नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी वाकड येथे राहणाऱ्या एका ३३ वर्षाच्या तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खराडी बासपास येथे १७ ऑगस्ट रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याच्या ऑफिसमध्ये काम करणारी महिला हिचे सोबत फिर्यादी चॅटिंग करीत होते. त्यांना लहु जाधव याने फोन करुन तिचे सोबत चॅटिंग करु नको, असे सांगून खराडी येथे भेटायला बोलावले. त्यानुसार फिर्यादी हे गेले असताना त्यांच्या चारचाकीमध्ये लहु व महेश हे बसले. तुझे तिच्याबरोबरचे चॅट केलेले स्किन शॉट आमच्याकडे आहे. लहु जाधव हा तिथला भाई आहे, असे सांगून मराठी मुलींचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे, असे सांगून लहू याने फिर्यादी त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेला.

तेव्हा त्यांच्याकडून फोन पेद्वारे १७ हजार रुपये घेतले. त्यांना मारहाण केली. फिर्यादीची कारची चावी व क्रेडिट कार्ड वापरुन मॉलमध्ये खरेदी केली. त्यानंतर त्यांना कोपरगाव येथे आणले. तेथे त्यांना डांबून ठेवले असताना त्यांनी बाथरुमला जाण्याचा बहाणा केला. त्यांची नजर चुकवून स्वत:ची सुटका करुन घेतले. शिर्डी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी तिघांना पकडून पुणे पोलिसांच्या हवाली केले. पोलीस उपनिरीक्षक रवी दळवी तपास करीत आहेत.

जीपीएसचा झाला फायदा

फिर्यादी तरुणाच्या कारला जीपीएस लावला होता. त्याने स्वत:ची सुटका करुन घेतल्यावर रिक्षातून पळून तो थेट शिर्डी पोलिसाकडे पोहचला. त्याने सर्व हकीकत सांगितली. त्यांनी त्याच्या कारचे लोकेशन तपासले तेव्हा ती त्यांच्याच दिशने येत असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी