शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी उभारली सुरक्षित वाहतूकीची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 16:12 IST

मैत्रयुवा फाऊंडेशनच्यावतीने वाहतूक पाेलिसांसह वाहतूकीबाबत जनजागृती करण्यात येणार असून, मैत्रयुवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते दर शनिवार अाणि रविवार या दिवशी शहरातील विविध चाैकांमध्ये वाहतूक नियमन करणार आहेत.

ठळक मुद्देवाहतूकीबाबत जनजागृती करणार ट्रफिक अॅम्बॅसिडरमैत्रयुवा फाऊंडेशनचे 150 ते 200 स्वयंसेवक हाेणार सहभागी

पुणे : तरुणांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत, तरुण भरधाव गाड्या चालवत असतात असे आपण नेहमीच ऐकत असतो. तरुणाई जोशात वाहन चालवत असते त्यामुळे अपघात होतात असेही म्हंटले जाते. पुण्यातील मैत्रयुवा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मात्र हा समज दूर करण्याचा विडा उचलला असून या फाऊंडेशनच्या वतीने संकल्प २०१८ हे अभियान सुरु केले असून त्याअंतर्गत आज टिळक चौकात सुरक्षित वाहतूकीची गुढी उभारण्यात आली.     गुढी सुरक्षिततेची, गुढी स्वयंशिस्तीची, गुढी सतर्कतेची, गुढी नियमांची, असा सुरक्षित वाहतूकीचा संदेश देत सुरक्षित वाहतुकीची गुढी पुण्यातील वाहतूक पोलिस आणि तरुणाईने एकत्रित येऊन उभारली. वाहतुकीचे सर्व नियम पाळत स्मार्ट पुण्याची वाहतूक व्यवस्था देखील स्मार्ट करु अशी ग्वाही तरुणांनी यावेळी वाहतूक पोलिसांना दिली. या तरुणांना ट्रफिक अ‍ॅम्बॅसिडर म्हणून संबोधण्यात येणार असून हे मैत्रयुवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते शनिवार आणि रविवार या दोन दिवशी शहरातील विविध चौकांमध्ये दोन तास वाहतूक पोलीसांसह वाहतूक नियमन करणार आहेत.     विशेष म्हणजे या फाऊंडेशनचे तरुण हे विविध क्षेत्रात कार्यरत असून आपल्या शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी या विचाराने ते स्वयंस्फुर्तीने या उपक्रमात सहभागी झाले आहेत. याविषयी बोलताना मैत्रयुवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे म्हणाले, आमच्या फाऊंडेशनच्यावतीने मैत्रीय कट्टा चालवला जातो. तेथे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रभाकर ढमाले यांनी तरुणांनी वाहतूक नियमनामध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहन केले होते. त्यावर आम्ही सर्वांशी चर्चा करुन दर शनिवार, रविवार वाहतूक पोलीसांसह वाहतूक नियमन करण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर आम्ही रस्त्यावर उतरुन पोलीसांसोबत विविध सणही साजरे करणार आहोत.     लोकमतशी बोलताना प्रभाकर ढमाले म्हणाले, मैत्र युवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते स्वेच्छेने या उपक्रमात सहभागी होत आहेत. वाहतुकीचे नियम पाळायला हवेत हा संदेश चांगल्या पद्धतीने ते नागरिकांपर्यंत पोहचवू शकतील. यासाठी त्यांना ट्रफिक अ‍ॅम्बॅसिडर म्हणून संबोधण्यात येणार आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPuneपुणेPoliceपोलिस