रक्तदानासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा : मानसिंग पाचुंदकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:30 IST2021-02-20T04:30:53+5:302021-02-20T04:30:53+5:30
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे मानसिंग पाचुंदकर युवा प्रतिष्ठान व स्व. दत्ता शेळके ...

रक्तदानासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा : मानसिंग पाचुंदकर
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे मानसिंग पाचुंदकर युवा प्रतिष्ठान व स्व. दत्ता शेळके युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मानसिंग पाचुंदकर यांनी स्वतः प्रथम रक्तदान करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. पुण्यातील राकेश जैन मेमोरियल रक्तपेढीच्या पथकाने रक्तदान संकलन केले. यावेळी माजी उपसरपंच नवनाथ लांडे, माजी ग्रा. पं. सदस्य दादाभाऊ शेळके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश धुमाळ, प्रथमेश शेळके, हृषीकेश शेळके, विकास शेळके, माऊली लांडे, अक्षय हगवणे तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ९० जणांनी रक्तदानाचे पवित्र काम केले.
फोटो: रांजणगाव गणपती येथे मानसिंग पाचुंदकर यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.