शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: भोसे येथे गोळीबारात तरुण गंभीर जखमी; दोन भावांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 13:28 IST

चाकण पोलिसांनी दोन भावांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली...

शेलपिंपळगाव (पुणे) : भोसे (ता. खेड) येथे एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छातीत गोळी लागल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला असून चाकण पोलिसांनी दोन भावांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. प्रसाद खांडेभराड (वय २२, रा. कडाचीवाडी, ता. खेड) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी सूरज ऊर्फ उद्धव कुटे (वय २५) व सौरभ कुटे (वय २३, दोघेही रा. भोसे, ता. खेड) या दोन भावांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुरुवारी (दि. ३) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भोसे ते काळुस रस्त्यावर ही घटना घडली. गुरुवारी रात्री दहा ते अकराचे सुमारास फिर्यादी प्रसाद खांडेभराड व त्याचा मित्र सूरज ऊर्फ उद्धव कुटे यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यातून फिर्यादी खांडेभराड याने उद्धव कुटे याला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी आपसातील वाद मिटविला. पुन्हा फिर्यादी प्रसाद हा आरोपी कुटे याला गाडीवरून सोडण्यासाठी त्याच्या घरी गेला. त्यावेळी आरोपीचा भाऊ सौरभ कुटे याला आपल्या भावाला प्रसादकडून मारहाण झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सौरभ कुटे व त्याच्या मित्रांनी फिर्यादी प्रसाद खांडेभराड याला जबर मारहाण करून गावठी पिस्तूलमधून फिर्यादी प्रसाद खांडेभराड याच्यावर गोळी झाडली. छातीत गोळी लागून प्रसाद गंभीर जखमी झाला.

त्यानंतर चाकण पोलिसांच्या पथकाने राजगुरुनगर जवळील सातकरस्थळ परिसरात नातेवाईकाच्या घरातून आरोपी सूरज व सौरभ कुटे यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, प्रसन्न जराड अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी