लोहगावमधील तरुणाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By Admin | Updated: July 8, 2017 02:43 IST2017-07-08T02:43:52+5:302017-07-08T02:43:52+5:30

लोहगावमधील दादाची वस्ती परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षांच्या तरुणाचा स्वाइन फ्लूमुळे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे

The youth of Lohagav died of swine flu | लोहगावमधील तरुणाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

लोहगावमधील तरुणाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
विश्रांतवाडी : लोहगावमधील दादाची वस्ती परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षांच्या तरुणाचा स्वाइन फ्लूमुळे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे लोहगावमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, हळहळ व्यक्त होत आहे.
भूषण शिरीष पाटील (रा. स. नं. ८०, प्लॉट क्र. १, आदर्शनगर, दादाची वस्ती, लोहगाव) असे निधन झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्या मागे वडील, भाऊ, पत्नी व साडेपाच वर्षांचा मुलगा, असा परिवार आहे. भूषण यांना ८ दिवसांपूर्वी थंडीताप आल्याने त्यांनी लोहगावमधील दवाखान्यात उपचार घेतले. मात्र, २ दिवसांनी पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना वाघोलीतील रुग्णालयात व तेथून पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी पाटील यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, येथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना २ दिवसांपूर्वी त्यांचे
निधन झाले.
दरम्यान स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: The youth of Lohagav died of swine flu