अपघातात लातूरचा तरुण ठार
By Admin | Updated: May 24, 2016 05:50 IST2016-05-24T05:50:22+5:302016-05-24T05:50:22+5:30
दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या या अपघातात लातूर जिल्ह्यातील तरुण जागीच ठार झाला. पुणे-नाशिक महामार्गावर वाकी बुद्रुक गावच्या हद्दीत सोमवारी (दि. २३) रोजी दुपारी अडीच

अपघातात लातूरचा तरुण ठार
चाकण : दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या या अपघातात लातूर जिल्ह्यातील तरुण जागीच ठार झाला. पुणे-नाशिक महामार्गावर वाकी बुद्रुक गावच्या हद्दीत सोमवारी (दि. २३) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
अरुण ज्ञानोबा मंदादे (वय २४, रा. भोसले निवास, आंबेगाव पठार, पुणे, मूळगाव- हिप्परसोगा, ता. औसा, जि. लातूर) असे मृत तरुणाचे नाव असून, तो पुण्याचा मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयातील होस्टेलचा विद्यार्थी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदादे हा तरुण पुण्यातील फुरसुंगी येथील
खासगी कंपनीत कामाला असून, तो कामानिमित्त खेड येथे कंपनीत आला होता.
काम उरकून तो
नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे आपली दुचाकी क्र. (एमएच १४ ए एल ६५०९) वरून जात
असताना वाहनावरील ताबा सुटल्याने येथील साई मंगल कार्यालयासमोर अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी होऊन तो मरण पावला. (वार्ताहर)