महाळुंगे येथे कोयत्याने वार करून युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:10 IST2021-05-16T04:10:18+5:302021-05-16T04:10:18+5:30

अतुल तानाजी भोसले (वय २८, रा, महाळुंगे, ता. खेड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी अक्षय पंडित ...

Youth killed by stabbing at Mahalunge | महाळुंगे येथे कोयत्याने वार करून युवकाची हत्या

महाळुंगे येथे कोयत्याने वार करून युवकाची हत्या

अतुल तानाजी भोसले (वय २८, रा, महाळुंगे, ता. खेड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी अक्षय पंडित बोऱ्हाडे (वय २६, रा. म्हाळुंगे) याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय अशोक शिवळे, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव (सर्व रा. म्हाळुंगे, ता. खेड) यांच्यासह तीन अनोळखी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. घटनास्थळी तीन कोयते पोलिसांना मिळून आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल भोसले व अक्षय शिवळे यांच्यात कंपन्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यावरून फोनवर बाचाबाची झाली होती. याच कारणावरून चिडून जाऊन (दि.१४) संध्याकाळच्या सुमारास अतुल भोसले हे चाकण तळेगाव रस्त्याने पायी जात असताना हॉटेल रेणुका समोर अचानक आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार गंभीर जखमी केले होते. अतुलला गंभीर अवस्थेत चाकण येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली.

फोटो - अतुल भोसले

Web Title: Youth killed by stabbing at Mahalunge