युवक-युवतींनी पार केली यशाची शिखरे

By Admin | Updated: January 12, 2017 02:33 IST2017-01-12T02:33:17+5:302017-01-12T02:33:17+5:30

आजची युवा पिढी आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी ठसा उमटवताना दिसत आहे. संगीत, नाट्य, क्रीडा, गिर्यारोहण, शाहिरी व नृत्य यांसारख्या

Youth-girls crossed the peak of success | युवक-युवतींनी पार केली यशाची शिखरे

युवक-युवतींनी पार केली यशाची शिखरे

संकलन : पूनम पाटील, प्रियांका गाडे

पिंपरी : आजची युवा पिढी आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी ठसा उमटवताना दिसत आहे. संगीत, नाट्य, क्रीडा, गिर्यारोहण, शाहिरी व नृत्य यांसारख्या अनेक कलांमध्ये युवक-युवती आपले कौशल्य दाखवीत आहेत. त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. काही जणांनी शहराचे नाव साता समुद्रापार कोरले आहे. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रांतील यशस्वी ताऱ्यांशी लोकमत प्रतिनिधीने केलेली बातचीत...

जिवापाड जपले नृत्य
कथक या शास्त्रीय नृत्यप्रकारात पायल गोखले या युवतीने नृत्य कौशल्याने संगीत क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली आहे. लहानपणापासूनच असलेली नृत्याची आवड ओळखून तिच्या आईने तिला नृत्यासाठी प्रोत्साहित केले. लहानपणापासूनच असलेली नृत्याची आवड ओळखून तिच्या आईने तिला नृत्यासाठी प्रोत्साहित केले. लहानपणापासूनच असलेली नृत्याची आवड ओळखून तिच्या आईने तिला नृत्यासाठी प्रोत्साहित केले. नृत्यांगना मनीषा साठे यांच्याकडे तिने शास्त्रीय कथक नृत्याचे शिक्षण घेतले. कथक या नृत्यप्रकारात अभिनय, नृत्य वमन यांचा सुरेख संगम असतो. नृत्यांगनेला या कला अवगत असणे अतिआवश्यक असते. ही कला आत्मसात करण्यासाठी पायलने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ती दररोज कमीत कमी आठ तास नृत्यकलेचा सराव करत असे. नृत्यासोबतच तिने अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले. ती अविरतपणे नृत्याचा सराव करत असे. अभ्यासासोबतच नृत्यकला ही जीवापाड जपली. कथक नृत्यशैलीत आपले अस्तित्व तयार केले. पायल अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची कथक नृत्यालंकार आहे. तसेच, या महाविद्यालयाच्या नृत्य विशारद परीक्षेत भारतात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. आजअखेर तिला पं. विष्णू दिगंबर पलुसकर पुरस्कार, युवागुरु पुरस्कार, युवा कलाकार व सिंगार मणी आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.ही कला आत्मसात करण्यासाठी पायलने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ती दररोज कमीत कमी आठ तास नृत्यकलेचा सराव करत असे. नृत्यासोबतच तिने अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले. ती अविरतपणे नृत्याचा सराव करत असे. अभ्यासासोबतच नृत्यकला ही जीवापाड जपली. कथ्थक नृत्यशैलीत आपले अस्तित्व तयार केले. पायल अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची कथक नृत्यालंकार आहे. तसेच, या महाविद्यालयाच्या नृत्य विशारद परीक्षेत भारतात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. आजअखेर तिला पं. विष्णू दिगंबर पलुसकर पुरस्कार, युवागुरु पुरस्कार, युवा कलाकार व सिंगार मणी आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पायल गोखले
(कथक नृत्यांगना)



गर्जा महाराष्ट्र माझा
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शाहिरी या संगीत कलेत सौरभ कवडे हा युवक आपले कौशल्य दाखवीत आहे. सौरभला बालपणापासूनच गायनाची आवड होती. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने शाहिरी या त्याच्या आवडीच्या संगीत क्षेत्रात प्रवेश केला. शाहिरीतील प्रत्येक विषयाचा खोल अभ्यास असावा लागतो. कारण शाहिरी झाल्यानंतर रसिक त्यासंदर्भातील अनेक प्रश्न विचारतात. त्याची उत्तरे शाहिराला माहिती असणे आवश्यक असते. यासाठी सौरभलाही सुरुवातीस इतिहासासोबतच चालूघडामोडीचा विशेष अभ्यास करावा लागला. खोल अभ्यास व गाण्याचा दैनंदिन रियाज यामुळे तो आज स्वत:ची शाहीर म्हणून प्रतिमा तयार करू शकला. महाराष्ट्राची प्रेरणा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, चालू घडामोडी व सामाजिक समस्यांवर तो पोवाडा सादर करतो. आजअखेर अडीचशेहून अधिक कार्यक्रमात त्याने सहभाग घेतला आहे. आजपर्यंत त्याने कलागौरव पुरस्कार, बालशाहीर पुरस्कार व गर्जा महाराष्ट्र आदी नामांकित पुरस्कार प्राप्त केले आहेत. या संगीत कार्यक्षेत्रात त्याला शाहीर संजय पायगुडे व अंबादास तावरे या गुरूंचे मार्गदर्शन लाभले. सौरभ अनेक शिबिर व कार्यक्रमात सहभागी असतो. या दरम्यान मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक शाहीर मान्यवरांचे तो आभार मानतो. त्याच्या शाहिरी जडणघडणीत या सर्वच गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे तो सांगतो. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रमाणिक प्रयत्न या कलाप्रकारात केला जातो. सर्वांपर्यंत इतिहास पोहचविण्याची संधी या कला प्रकारातून मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी ही कला आत्मसात करावे, असेही त्याने सांगितले.
शाहीर सौरभ कवडे



जिद्दीच्या जोरावर गाठले ‘शिखर’
गिर्यारोहण म्हटले की समोर येतात ती म्हणजे उंचच्या उंच शिखरे आणि त्यांच्यावर चढाई करण्याच्या विचारानेच काहींना घाम फुटतो. परंतु श्रीहरी तापकीर हा मराठी तरुण या कठीण मोहिमा धाडसाने यशस्वीरीत्या पार पाडत आहे.
शेतकरी कुटुंबातील हा मुलगा केवळ जिद्दीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. सुरुवातीस तो किल्ले भटकंती करीत असे. यादरम्यान त्याचे गिर्यारोहण क्षेत्रातील गुरु व त्यांचे सहकारी कै. रमेश गुळवे यांनी त्याला गिर्यारोहणाविषयी मार्गदर्शन केले. मोहिमे दरम्यान येणाऱ्या प्रत्येक समस्यांचा त्याने धिटाईने सामना केला. आजअखेर त्याने हिमालयातील माउंट डीकेडी -टू (५८७०मी), माउंट सीबी चंद्रभागा १२(६२८०), माउंट मेरा ६५५४ मी, माउंट आइलैंड ६१८९मी, माउंट एवरेस्ट ८८४८मी, माउंट मेंथोसा ६६५४मी, माउंट देवतिब्बा ६००१ मी, माउंट स्टोक कांगरी ६१५३ मी आदी शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. नेपाळच्या बाजूने चढाई करणारा पहिला महाराष्ट्रीयन आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील अनेक कठीण सुळके कातळभिंती कडे सर केली आहेत. तापकीर यांनी हिमालय माउंटेनियरींग इन्स्टिट्युट मधून बेसिक माउंटिंग कोर्स ए ग्रेडमध्ये पास केला आहे. तर नेहरु इन्सिट्यूट माउंटेनियरींग उत्तरकाशी मधून अ‍ॅडव्हान्स माउंटेनियरींग कोर्स व सर्च अ‍ॅन्ड रिस्क्यु हा कोर्स ए ग्रेडने उत्तीर्ण झाले आहे. आपत्ती-व्यवस्थापन अंतर्गत अनेक कार्यक्रमात सक्रीय सहभाग दर्शविला आहे. काही तरी वेगळे करायची इच्छा असणाऱ्यांनी या क्षेत्रात जरूर यावे, तसेच, प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेत मार्ग काढणे गरजेचे असते. तर यश मिळते असा संदेशही ही खेळ प्रकार सांगत असल्याचे त्याने सांगितले..
श्रीहरी तापकीर


अभिनयासाठी अथक परिश्रम
मूळचा सातारा येथील वाडीवजा चोरगेवाडी गावातून आलेला प्रभाकर पवार हा तरुण नाट्यक्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत आहे. खडतर परिस्थितीतही त्याने अथक परिश्रम करत त्याने हे यश संपादन केले आहे. महाविद्यालयात शिक्षण, नाटकात वेगवेगळे प्रयोग करत असताना नोकरी संदर्भात मुंबईत आला. येथूनच त्याच्या नाट्य कारकिर्दीस खऱ्या अर्थाने अभिनय कारकिर्दीस सुरुवात झाली. आजअखेर त्याने २३ मराठी एकांकिका, तीन दीर्घांक, सहा दोन अंकी मराठी नाटके व काही मालिकांसाठी लेखन करीत लेखक म्हणून ओळख निर्माण केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पुणे यांचा सर्वोत्कृष्ट गद्य नट, नवोदित लेखक व स्थानिक कलाकार, महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट नट म्हणून रौप्य पदक, कलागौरव तर राज्यस्तरीय व आंतरमहाविद्यालयीन एकांकिका व नाटक, मूकनाट्य, लघुनाट्य व पथनाट्यसारख्या रंगमंचीय आविष्कारांसाठी १८हून अधिक दिग्दर्शनसाठी, १३ अभिनयासाठी, ११ लेखनासाठी, सात नेपथ्यासाठी व नऊ प्रकाशयोजनेसाठी आदी अनेक नाट्य क्षेत्रातील, परंतु विविध कलेसाठी पारितोषिके मिळाली आहेत. जिद्द व चिकाटी जोरावर कोणत्याही क्षेत्रात तुम्ही यश संपादन करू शकता, असे पवार याने सांगितले.
प्रभाकर पवार (नाट्यक्षेत्र)


बेस्ट प्ले बॅक सिंगर
मध्यमवर्गीय कुटुंबातील घरात कोणतीही संगीताची पार्श्वभूमी नसतानाही गायक होण्याचे स्वप्न संदीपने बाळगले. तसेच, पार्श्व संगीतातील बॉलिवूडचा बेस्ट प्ले बॅक सिंगर हा पुरस्कार मिळवायचा या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. सुरुवातीस त्याने वैयक्तिक कार्यक्रम केले. महविद्यालयातील प्रत्येक कार्यक्रमात तो सहभागी झाला. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा त्याने लाभ घेतला. जिद्द, चिकाटीच्या जोरावर त्याने यश मिळवले. रसिकांची कौतुकाची थाप मिळाली. या सांगीतिक प्रवासात त्याचे गुरू स्मिता देशमुख, प्रमोद रानडे व पं. विजय कोपरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याने इंडियन आयडॉल व सा रे ग म प या संगीत कार्यक्रमात आपली कला सादर केली आहे. संदीपने पांगिरा, पाऊलवाट, पिपाणी, गुरुपौर्णिमा, लंगर, जकात आदी चित्रपट व मराठी अल्बमसाठीही पार्श्वगायन केले आहे. त्याच्या या सांगीतिक वाटचालीत त्याला सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्यासोबत गाण्याची संधी मिळाली. त्याच्या या यशाचे श्रेय तो कुटुंब, गुरुजन, मित्र मंडळी यांना देतो. संदीपला नवोदय गायक, अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्ट फाउंडेशनचा उत्कृष्ट युवा गायक पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत.
संदीप उबाळे (गायक)




 

Web Title: Youth-girls crossed the peak of success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.